• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनतर्फे राष्ट्रीय केळी दिवस साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 19, 2023
in कृषी, जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनतर्फे राष्ट्रीय केळी दिवस साजरा

जळगाव, दि.१९ – जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जैन फार्मफ्रेश फूड्स लिमिटेड यांच्यातर्फे शहरातील भाऊंचे उद्यानाजवळ ‘राष्ट्रीय केळी दिवस’ साजरा करण्यात आला. केळीचे आरोग्यदृष्टीने असलेले अनन्य साधारण महत्त्व यावर विशेष जनजागृती करण्यात आली तसेच नागरिकांना ताजी पिकलेली केळी वाटप करण्यात आली.

केळी फळातील पौष्टीक गुणधर्म या पॉकेट कार्डचे प्रकाशन प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याहस्ते करण्यात येऊन ते नागरिकांना वाटप केले गेले. या दिनाचे औचित्य साधत काव्यरत्नावली चौकाची सजावट करण्यात आलेली असून भाऊंच्या उद्यानाशेजारी केळी बाबतचा सेल्फी पॉइंट देखील लावला गेला होता. यावेळी अनेकांनी आपले सेल्फी काढून घेऊन केळीचे आहारातील महत्त्व समजावून घेतले.

केळी हे फळ इतर फळापेक्षा किती अधिकचेअन्न घटक देते हे नमूद केले आहे. केळी ही नैसर्गिक वेस्टनात म्हणजे सालच्या आतमध्ये गर असल्यामुळे अत्यंत निर्जंतुक व शुद्ध फळ आहे अशी माहिती या प्रकाशीत पॉकेट कार्डमध्ये देण्यात आली आहे. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी राष्ट्रीय केळी दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्व प्रथम २००९ मध्ये राष्ट्रीय केळी दिवस लंडनमध्ये साजरा करण्यात आला होता. यामध्ये केळी महोत्सव उपक्रम करण्यात आला होता. तेव्हापासून सर्व जगभर राष्ट्रीय केळी दिवस साजरा केला जातो.

ठिबक सिंचनासारख्या अत्याधुनिक सिंचन प्रणालीचा, उच्च कृषितंत्रज्ञानाचा उपयोग करून येथील शेतकरी केळीचे सर्वोच्च उत्पादन घेतात. केळीचे महत्त्व अबाल वृद्धांना समजावे यासाठी राष्ट्रीय केळी दिवस खूप उपयुक्त ठरत असतो. जैन इरिगेशनने समाज भान ठेवून हा उपक्रम राबविणे ही देखील चांगली बाब असल्याचे प्रवीण महाजन यावेळी म्हणाले. जळगाव हे देशातील बनाना सिटी असल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमास प्रवीण महाजन यांच्यासह नायब तहसीलदार अमित भोईटे, विशाल सोनवणे, उप जिल्हाधिकारी राहूल पाटील तसेच डॉ. सुरेश पाटील, एम.एन. महाजन, अभियंता, पी.एम. चौधरी, डॉ. सुधीर भोंगळे, राजेश वाणी, अनिल कांकरिया, सुदामपाटील, आर. डी. महाजन, जैन इरिगेशनचे केळीतज्ज्ञ डाॅ. के.बी. पाटील, मोहन चौधरी, शुभम पाटील, भास्कर काळे, गौरव पाटील, किशोर रवाळे, विकास मल्हारा, अनिल जोशी यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

Next Post
जामनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी; अन्यथा आम्ही स्वस्त बसणार नाही !

जामनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी; अन्यथा आम्ही स्वस्त बसणार नाही !

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू! युती तुटल्यास सर्व ७५ जागा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज
खान्देश

जळगाव महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू! युती तुटल्यास सर्व ७५ जागा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज

December 16, 2025
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
खान्देश

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

December 15, 2025
ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!
खान्देश

ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

December 15, 2025
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!
खान्देश

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

December 15, 2025
निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय
खान्देश

निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

December 15, 2025
जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?
खान्देश

जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

December 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group