• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव शहरातील रस्त्यांसाठी बहुप्रतिक्षित १०० कोटीचा निधी मंजूर

आमदार राजूमामा भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 5, 2023
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगाव शहरातील रस्त्यांसाठी बहुप्रतिक्षित १०० कोटीचा निधी मंजूर

जळगाव, दि.०५ – जळगाव शहरातील रस्त्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बहूप्रतीक्षित असलेला१०० कोटी रुपयांचा निधी अखेर मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात राज्य शासनाकडून ५० कोटी रुपये निधी प्राप्त होणार आहे. शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी यासाठी राज्य शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला होता. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना जळगाव शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती.

मात्र त्यानंतर काही वर्ष लोटली तरी जळगाव शहराला निधी मिळाला नव्हता. हा निधी मिळवण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर बुधवारी ५ एप्रिल रोजी राज्य शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातील ५०% निधी पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात येणार आहे. या निधीअंतर्गत जळगाव शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचे निधी मिळवून देण्यासाठी मोठे सहकार्य लाभले, अशी माहिती आ.राजूमामा भोळे यांनी दिली.

राज्य शासनाने काढलेल्या जीआर मध्ये म्हटले आहे की, सदर प्रकल्प खर्चाचा १००% हिस्सा राज्य शासनाचा राहणार आहे. प्रकल्प अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या कामांचा कामांना प्रकल्प खर्चाच्या मर्यादेत सक्षम प्राधिकार्‍यांची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली याची खातरजमा जिल्हाधिकाऱ्यांनी करायचे आहे. प्रकल्पाअंतर्गत कार्यान्वयन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभागाची राहणार आहे. निविदा प्रक्रियेद्वारे कामकाज चालेल.

सदर प्रकल्प अंतर्गत असणारी कामे ही सार्वजनिक मालकीच्या ठिकाणीच करावीत याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची आहे. सदर प्रकल्प अंतर्गतची कामे शहर विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखड्याशी सुसंगत असल्याबाबत खातरजमा करणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे काम राहील. या अंतर्गत उपलब्ध करून दिलेला निधी त्याच उद्दिष्टासाठी खर्च करण्यात येत असल्याचे तसेच काम गुणवत्तेनुसार झाले आहे किंवा कसे तसेच मंजूर कामावरच मंजूर निधी खर्च होत आहे का हे पाहण्याची देखील जबाबदारी ही जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे जळगाव शहरातील नागरिकांना आता पक्के आणि चांगले रस्ते मिळवून देण्याची जबाबदारी ही महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाची राहणार आहे.

 


 

Next Post
कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी.. – अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

जैन इरिगेशनचे अध्यक अशोक जैन यांना ‘महाराष्ट्र बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add