जळगाव, दि.१८ – बचत गटातील महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव भरारी फाउंडेशनतर्फे १९ ते २३ जानेवारी दरम्यान सागर पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलायं. फाउंडेशनतर्फे महोत्सव आयोजनाचे यंदाचे सलग आठवे वर्ष असून गुरूवारी सायंकाळी साडेपाचला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
यावेळी कृषी संचालक विकास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, दशरथ तांबोळी, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उद्योगपती रजनीकांत कोठारी, अनिल कांकरिया, बाळासाहेब सुर्यवंशी, किशोर ढाके, कुशल गांधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महिला बचत गटांनी निर्माणकेलेल्या वस्तूंना हक्कांचे व्यासपीठ मिळून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, हा उद्देश आहे. या महोत्सवात जळगावसह खान्देशातील २६० बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले.
१९ जानेवारीला महिलांसाठी ‘खेळ चारचौघींचा, जागर पोष्टीक तृणधान्यांचा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर २० जानेवारीला परिवर्तन संस्था जळगाव यांचे अरे संसार संसार’ कवितांची मैफल, ह.भ.प. महादेव महाराज शेंडे यांचे ‘आल्या पाच गवळणी’ भारुड सादर होईल. तर २१ जानेवारीला मराठी संस्कृतीचा फॅशन शो, २२ जानेवारीला शाहीर देवानंद माळी यांचा स्वातंत्र्याची शौर्यगाथा पोवाडा असे सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
बहिणाबाई पुरस्कार जाहीर..
पद्मश्री राहीबाई पोपरे (अहमदनगर), विकास पाटील कृषी संचालक पुणे, तात्यासाहेब फडतरे पुणे, श्रीराम पाटील जळगाव, अंजलीराजे जाधव नाशिक, सुकन्या पाटील जळगाव, श्रृती थेपडे जळगाव, राजेंद्र ठोंबरे चाळीसगाव, राहुल पाटील चोपडा, परिवर्तन संस्था जळगाव यांना यंदाचा बहिणाबाई पुरस्कार जाहीर करण्यात आलायं.