• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा.. – अनिकेत पाटील

गांधी रिसर्च फाऊंडेशन येथे सरपंच निवासी प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 21, 2022
in जळगाव जिल्हा
0
ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा.. – अनिकेत पाटील

जळगाव, दि.२१ – ग्रामविकासामध्ये ग्रामपंचायतीचे महत्त्व खूप आहे त्याचे अधिकार समजून घेताना सरपंचांनी आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या समजून घेतले पाहिजे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास करता येऊ शकतो यासाठी रचनात्मक कार्य केले पाहिजे, गांधी रिसर्च फाऊंडेशन येथे सुरू असलेल्या यशदाच्या सरपंच निवासी प्रशिक्षण शिबीर सरपंचांनी मोलाचे मार्गदर्शक ठरू शकते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी केले.

यशदा प्रशिक्षण केंद्रातर्फे सुरू दि.२० ते २३ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या निवासी सरपंच प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी अनिकेत पाटील बोलत होते. दीप्रज्वलनाने सुरवात झाले. अनिकेत पाटील यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे नितीन चोपडा, यशदा सत्र समन्वयक कल्पना पाटील, यशदा प्रविण प्रशिक्षक अशोक पाटील, पीआरटीसी खरोदा सेवानिवृत्त प्राचार्य रमेश चौधरी उपस्थित होते.

जागतिक संघटना युनोने शाश्वत विकासासाठी १७ संकल्पांसह २०३० पर्यंत कार्य करण्याचे ठरविले असून यात १९४ देशांनी सहभाग घेतला आहे. त्या संकल्पना, ध्येयांविषयी जनजागृतीसाठी भारताने नऊ विकासात्मक संकल्पनांवर काम सुरू केले असून यातील कमीत कमी तीन संकल्पांवर कृतिशील काम करून गावागावांमध्ये विकासगंगा पोहचविण्याचे ध्येय निश्चिती केले आहे.

यानुसार पुणे यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ शेड्डी, सत्रसंचालक दत्तात्रय पोहरे यांच्या मार्गदर्शनानुसार गांधी रिसर्च फाऊंडेशन येथे सरपंच परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये चाळिसगाव, भडगाव, पाचोरा, पारोळा, चोपडा या तालुक्यातील सुमारे ३० च्यावर सरपंचांनी सहभाग घेतला. गांधीजींचा विचार हा ग्रामविकासाच महत्त्वाचा केंद्र आहे त्यानुसार हे प्रशिक्षण प्रासंगिक असल्याचे नितीन चोपडा यांनी सांगितले.

आज रमेश चौधरी यांनी ग्रामपंचायत अधिनियम, ग्रामसभेसह सर्वसभा, ग्रामपंचायत पंचाग, दफ्तरांच्या नोंदी १ ते ३३ नमुने यावर मार्गदर्शन केले. अशोक पाटील यांनी लेखासंहिता, अंदाजपत्रक, लेखा परिक्षण, आर्थिक नियोजन, ताळेबंद यासह महत्त्वाच्या नोंदी यावर मार्गदर्शन केले. कल्पना पाटील यांनी खेळ दोन पाऊल पुढे दोन पाऊल मागे यातून रंजकपद्धतीने एसडीजी थीमने गावातील वंचित घटकांना सोबत घेऊन शाश्वत विकास कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले. प्रस्तावना व आभार कल्पना पाटील यांनी मानले.

Next Post
जामनेर येथे तीन दिवसीय ‘परिवर्तन आनंदयात्री महोत्सव’

जामनेर येथे तीन दिवसीय ‘परिवर्तन आनंदयात्री महोत्सव’

ताज्या बातम्या

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
खान्देश

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

December 15, 2025
ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!
खान्देश

ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

December 15, 2025
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!
खान्देश

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

December 15, 2025
निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय
खान्देश

निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

December 15, 2025
जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?
खान्देश

जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

December 13, 2025
‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन
खान्देश

‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन

December 12, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group