• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेवाळे परिसरात ढगफुटीने शेती पिकांचे नुकसान

आमदार अनिल पाटील यांनी केली पाहणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 19, 2022
in कृषी, जळगाव जिल्हा
0
शेवाळे परिसरात ढगफुटीने शेती पिकांचे नुकसान

गजानन पाटील | अमळनेर, दि.१९ – विधानसभा मतदारसंघातील व पारोळा तालुक्यातील शेळावे महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये ८५ मि.ली. इतका पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र महाबीज च्या पर्जन्य मापकात अचूक मोजणी होत नसल्याने अतिवृष्टीची नोंद होत नसल्याचा आरोप आमदार अनिल भाईदास पाटील व माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केला.

दरम्यान आ.अनिल पाटील यांनी माजी आ. कृषिभूषण पाटील तसेच तहसीलदार व कृषी अधिकारी यांना सोबत घेत रत्नापिंप्री, शेळावे बु., शेळावे खु., चिखलोड, दहिगाव, मोहाडी, दगडी सबगव्हाण, राजवड यांनी ढगफुटी सदृश पावसामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी कापूस व मका पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.

ग्रामस्थ मंडळ व शेतकरी बांधवांशी चर्चा करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला व राज्य शासनाने तत्काळ पंचनामे करून, नुकसानग्रस्त भागासाठी व शेतकऱ्यांसाठी तत्काळ मदत जाहीर करावी व त्या परिसरातील ना दुरूस्त व खराब पर्जन्य मापक यंत्र तात्काळ बदलून चांगल्या प्रतीचे पर्जन्यमापक यंत्र बसवून मिळावे जेणे करून पावसाचे अचूक पर्जन्यमान मिळून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान या भागातील ना दुरूस्त व खराब पर्जन्यमापक यंत्रामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षा पासून पडणाऱ्या ओला दुष्काळ मुळे नुकसान भरपाई आज तागायात मिळाली नसल्याचेही यावेळी उघड झाले. माजी आ. कृषिभूषण पाटील यांनी या नुकसानीच्या बऱ्याच बाबी आमदारांसमोर मांडल्या.

विमा कंपनीचे हित जोपासण्याचा हा प्रकार.. आ.अनिल पाटील
यासंदर्भात आ. अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले की महाबीज कंपनीच्या पर्जन्यमापक यंत्रातून चुकीचे मोजमाप होत असल्याचे निदर्शनास आले आहे, महसूलची यंत्रे अचूक मोजमाप दाखवीत असताना महाबीज चे मोजमाप चुकीचे कसे, विमा कंपनी चे हित जोपासण्याचा हा प्रकार असेल, शासनाच्या ते निदर्शनास आणून दिले जाईल. याभागात गेल्या दहा दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने पिके हातची गेली आहेत. यासाठी एनडीआरएफ व एसडीआरएफ निकष बदलवणे आवश्यक आहेत. याठिकाणी संपूर्ण मका आडवा झाला असून कापूस पीक मुळासकट सडत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना आमची मागणी आहे की या महसूल मंडळात पिकांचे सरसकट पंचनामे करून संपूर्ण शेतकऱ्यांना अति तातडीची मदत जाहीर करावी. आणि यापुढे अचूक पर्जन्यमाप कसे होईल त्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.


 

Next Post
पिंपळकोठे येथील फरशी पुलाची दुरावस्था ; रस्ता ओके मात्र फरशीपुल जैसे थे !

पिंपळकोठे येथील फरशी पुलाची दुरावस्था ; रस्ता ओके मात्र फरशीपुल जैसे थे !

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add