जळगाव, दि.27 – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाला असणार्या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे गुरुवारी समुपदेशन करण्यात आले. किचकट विषयाचा अभ्यास कसा करावा, यासंदर्भात टिप्स देत विषयानुसार अभ्यासाच्या वेळाही यावेळी प्राध्यापकांनी ठरवून दिल्यात.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित समुपदेशनाप्रसंगी अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, प्रा.डॉ.शिवानंद राठोड, प्रा.डॉ.विठ्ठल शिंदे, प्रा.डॉ.शुभांगी घुले हे उपस्थीत होते. प्रास्ताविकात रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांनी समुपदेशन बैठकीमागील उद्देश्य सांगितला.
यावेळी प्रा.डॉ.विठ्ठल शिंदे यांनी विषयानिहाय पेपर कसा सोडवावा यावर मार्गदर्शन केले तसेच परिक्षा पद्धतीची माहिती दिली. प्रा.डॉ.शुभांगी घुले यांनी सांगितले की, या परिक्षेत अपयश आले म्हणजे सगळे संपले असे नाही. तर अभ्यास कसा करावा तसेच पेपर व प्रात्याक्षिक पद्धती विषयी माहिती दिली. तसेच मोबाईलच्या आहारी जावू नका, तर अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. असे आवाहनही प्रा.डॉ.घुले यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसह पालकांच्या शंकांचे प्रा.डॉ.शिवानंद राठोड यांनी निरसन केले.
अॅक्शन प्लॅनचा अवलंब करा – डॉ.आर्विकर
अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर यांनी सांगितले की, यश प्राप्तीसाठी जिद्द महत्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यास कसा सुरु आहे, याची पालकांनीही माहिती ठेवावी. विद्यार्थ्यांनी हिंमत न हारता नव्याने तयारी करावी, त्याकरीता महाविद्यालयाने अॅक्शन प्लॅन तयार केला असून त्यांचा अवलंब विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन डॉ.आर्विकर यांनी केले.