• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रा. सुषमा कंची यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 4, 2022
in शैक्षणिक
0
प्रा. सुषमा कंची यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

जळगाव, दि.०४ – मुंबई येथे राजभवनात ०३ सप्टेंबर रोजी सिंघानिया शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सिंघानिया शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार अति महत्त्वाचा मानला जातो . या पुरस्काराचे वितरण शिक्षक दिनाचे औचित्य साधून करण्यात येत असते. या पुरस्कारासाठी अशाच सेवाभावी प्राचार्यांची निवड करण्यात येते.

दरम्यान आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये प्रत्येक महत्त्वाची जबाबदारी अतिशय यशस्वीरित्या अचूक पार पाडून आपले अस्तित्व सिद्ध करून दाखविले आहे. संपूर्ण भारतातून निवडक प्राचार्यांनाच या सन्मान सोहळ्यासाठी आमंत्रित केले जाते. यावर्षी के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची निवड करण्यात आली. त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुषमा कंची यांना राज्यपाल यांच्या हस्ते सिंघानिया उत्कृष्टता पुरस्कार मिळणे ही के.सी.ई. सोसायटीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे, असे गौरव उद्गार संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी करून प्राचार्य सुषमा कंची यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष डी.टी.पाटील आणि प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी देखील प्राचार्या सुषमा कंची यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच स्कूलच्या उपप्राचार्या माधवीलता सिट्रा आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Next Post
पाडळसरे गावात ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना

पाडळसरे गावात 'एक गाव एक गणपती'ची स्थापना

ताज्या बातम्या

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल
गुन्हे

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

February 19, 2026
टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न
आरोग्य

टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न

February 18, 2026
लीनेस क्लब जळगावचा सामाजिक उपक्रम: आवार येथील ‘वाचन कट्ट्या’ला शालेय साहित्याची मदत
जळगाव जिल्हा

लीनेस क्लब जळगावचा सामाजिक उपक्रम: आवार येथील ‘वाचन कट्ट्या’ला शालेय साहित्याची मदत

February 18, 2026
जळगावात शिवजयंतीचा उत्साह; शिवकॉलनीत छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीचे होणार अनावरण
जळगाव जिल्हा

जळगावात शिवजयंतीचा उत्साह; शिवकॉलनीत छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीचे होणार अनावरण

February 17, 2026
प्लास्टिक विरोधात जळगाव महापालिकेचा ‘एल्गार’; १ मार्चनंतर थेट २५ हजारांचा दंड अन् फौजदारी गुन्हे!
जळगाव जिल्हा

प्लास्टिक विरोधात जळगाव महापालिकेचा ‘एल्गार’; १ मार्चनंतर थेट २५ हजारांचा दंड अन् फौजदारी गुन्हे!

February 18, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
कृषी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group