• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार प्रदान

आचार्य अत्रे सार्वभौम व्यक्तिमत्व.. - कविवर्य महानोर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 14, 2022
in जळगाव जिल्हा
0
कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार प्रदान

जळगाव, दि.१४ – आचार्य अत्रे हे साहित्य, नाट्य, चित्रपट, उद्योग, वक्तृत्व असा सर्वच क्षेत्रांतील सार्वभौम उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने मिळालेले मानचिन्ह मी कृतज्ञतेने स्विकारतो असे प्रतिपादन कविवर्य ना. धों. महानोर यांनी सत्काराला उत्तर देताना केले. संयुक्त महाराष्ट्राचे झुंजार सेनापती, साहित्य सम्राट, आचार्य प्र.के.अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीदिनी (१३ ऑगस्ट) आचार्य अत्रे मानचिन्हाचा पुरस्कार यावर्षी प्रख्यात कवी ना.धो.महानोर यांना प्रदान केला.

‘आत्रेय’ तर्फे हा पुरस्कार प्रदान समारंभ पहिल्याप्रथम मुंबई शिवाय खानदेशात जैन हिल्सला झाला. व्यासपीठावर कविवर्य ना. धों. महानोर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आ. शिरीष चौधरी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित होते. आरंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

‘आत्रेय’ संस्था तर्फे राजेंद्र पै यांनी मान्यवरांचे स्वागत केले. परिवर्तन संस्थेचे कलाकार वैशाली शिरसाळे, अक्षय गजभिये, सुदीप्ता सरकार यांनी आचार्य अत्रे व बहिणाबाई चौधरी यांचे गीत सादर केले. ह्या सादरीकरण बद्दल शंभू पाटील यांनी सांगितले. आचार्य अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै यांनी प्रास्ताविक केले.

माझे वडील शिक्षण मंत्री होते भूगोलाच्या पुस्तकात चूक झाली होती. अत्रे साहेबांनी त्यांच्या पेपर मध्ये खुलासा छापला ह्या बाबत आचार्य अत्रे यांची आठवण सांगितली. आमच्या वडिलांना अत्रे भाचेबुवा म्हणायचे त्यांचा स्नेह आम्हाला लाभला असे आ. शिरीष चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमात इंद्रायणी सावरकर लिखित ‘महाराष्ट्राचा महासंग्राम’ पुस्तकाचं प्रकाशन कविवर्य महानोर यांच्या हस्ते करण्यात आले.

अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान झाल्यावर मनोगत व्यक्त केले. महानोर दादा म्हणजे निसर्ग, शेतकरी, रानातली कविता, लोकसाहित्य, निसर्गाशी नाळ जोडून ठेवलेल्या महानोर दादा बद्दल त्यांनी गुणवैशिष्ट्ये सांगितले. दादांना पानझड पुस्तकाला साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला त्यावेळी मोठा सत्कार झाला होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी मिरवणुकीची बैलगाडी चालवली होती दादांचा हा सत्कार म्हणजे भवरलालजी व महानोर दादा यांच्या मित्रत्वाचा सत्कार होय असे आवर्जून सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर भावे यांनी तर आभारप्रदर्शन राजेंद्र पै यांनी केले. मंजुषा भिडे यांनी म्हटलेल्या वंदे मातरम राष्ट्रगीताने झाला.

चक्रवर्ती अशोक भाऊ!
अशोक भाऊ यांना मी चक्रवर्ती म्हणतो. अशोकभाऊ यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान झाला. आज मला भाऊ ची आठवण आली. मला साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला त्यावेळी मी बैलगाडीत बसलो होतो व भवरलालजी जैन धुरकरी होते ते बैलगाडी चालवित होते. आज इलेक्ट्रॉनिक गाडी स्वतः चालवित मला इथे आणले… मला खूप समाधान वाटते असे कविवर्य महानोर म्हणाले.

Next Post
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रीय एकात्मता मोटरसायकल तिरंगा रॅली

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रीय एकात्मता मोटरसायकल तिरंगा रॅली

ताज्या बातम्या

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप
खान्देश

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप

October 18, 2025
सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
खान्देश

सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 18, 2025
सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!
खान्देश

सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!

October 17, 2025
बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group