• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोषणाईने उजळले महापुरुषांचे पुतळे

जैन इरिगेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे विद्युत रोषणाईतून राष्ट्रभावनेचा जागर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 13, 2022
in जळगाव जिल्हा
0
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोषणाईने उजळले महापुरुषांचे पुतळे

जळगाव, दि.१३ – स्वातंत्र्याचा इतिहास हा बलिदान आणि शौर्याचा आहे. स्वातंत्र्यविरांच्या पराक्रमाच्या या गाथेचे स्मरण करीत समतेसोबतच विश्वशांतीचा संदेश देणारी विशेष सजावट शहरातील चौकांमध्ये करण्यात आली आहे. तिरंग्यातील शौर्य, शांती, त्यागाच्या तिनही रंगाच्या विद्युत रोषणाईने जळगाव शहर उजाळुन निघाले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे आकर्षक रंगसंगती असणारी विद्युत रोषणाई केली आहे. यात शहरातील राष्ट्रीय महापुरूषांच्या १९ पुतळ्यांसह, लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक यासह महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान यांचा समावेश आहे. यातुन शहरवासियांच्या मनात राष्ट्राभिमानाचा जागर होत आहे.

जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे शहरातील चौकांवर विशेष सजावटींसह प्रबोधनात्मक संदेश दिले आहे. यातून राष्ट्रीय एकात्मेची जाणिव निर्माण होत आहे. काव्यरत्नावली चौकात विशेष सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोबतच लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक याठिकाणीही विद्युत रोषणाईतुन राष्ट्रभक्तीचा जागर केला आहे.

महापुरूषांच्या पुतळ्यांवर रोषणाई..
शहरातील १९ सार्वजनिक स्थळी असलेल्या राष्ट्रीय महापुरूषांच्या पुतळ्यांवर रोषणाई केली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर, शाहिर अण्णाभाऊ साठे, सानेगुरूजी, स्व.जेठमल स्वारस्वत स्तंभ, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगे बाबा, धनाजी नाना, महर्षी वाल्मीक, कवयित्री बहिणाबाई, संत जगनाडे महाराज, नवल स्वामी महाराज या राष्ट्रीय महापुरूषांच्या पुतळ्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Next Post
कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार प्रदान

कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप
खान्देश

सायबर पोलिसांची मोठी कारवाई; साडेबारा लाखांचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत, मूळ मालकांना केले वाटप

October 18, 2025
सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
खान्देश

सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 18, 2025
सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!
खान्देश

सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!

October 17, 2025
बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group