• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सीआयएससीई बोर्डच्या परिक्षेत देशातून अनुभूतीची रितीका देवडा तृतीय, अनुभूती स्कूलमध्ये प्रथम, आत्मन जैन द्वितीय

अनुभूती निवासी स्कूलचा यंदाही १०० टक्के निकाल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 26, 2022
in शैक्षणिक
0
सीआयएससीई बोर्डच्या परिक्षेत देशातून अनुभूतीची रितीका देवडा तृतीय, अनुभूती स्कूलमध्ये प्रथम, आत्मन जैन द्वितीय

जळगाव, दि.२६ – अनुभूती निवासी स्कूलच्या दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये अनुभूती स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीदेखील कायम राहिली आहे. आयसीएसई बोर्डच्या १२ वी इयत्तेत २९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यापैकी वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी रितीका अरूण देवडा ही ९९.२५ टक्के गुणांसह पहिली आली. आत्मन अशोक जैन (९७.७५ टक्के) द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून आत्मन हा शाळेच्या विज्ञान शाखेतून प्रथम आला आहे.

संपूर्ण भारतातून ९६,९४० विद्यार्थ्यांनी १२ वी इयत्तेसाठी परिक्षा दिली. त्यापैकी ९६,३४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात ४५,५७९ विद्यार्थीनी तर ५०,७६१ विद्यार्थी यांचा समावेश आहे. गौरवास्पद बाब म्हणजे संपूर्ण भारतातून आयसीएसई रॅंकच्या मेरिटमध्ये रितीका तिसरी तर अनुभूती स्कूलमधून ती पहिली आली आहे.

अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची खान्देशातील पहिलीच शाळा आहे. संस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय संस्कृती पुढच्या पिढीला संस्कारीत व्हावी, एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण होणे यादृष्टीने अनुभूती स्कूलतर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक जाणिवेसह संवेदनशील नागरीक घडावे यासाठी गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यातून विविध क्षेत्रात विद्यार्थी यश संपादित करीत आहे.

अनुभूती निवासी स्कूलच्या निकालाची वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या निकालामध्ये ९० टक्क्यांच्यावर आठ विद्यार्थी असून भारतातील रॅंक मेरिटमध्येसुद्धा विद्यार्थी चमकले आहेत. अनुभूती स्कूलमध्ये पहिल्या पाचमध्ये रितीका व आत्मन यासह तृतीय क्रमांकाने परिनिती अग्रवाल (९५.७५ टक्के), चतुर्थ क्रमांकाने उर्वेशा सुनिल नवघरे (९४ टक्के), पाचव्या क्रमांकाने तन्वी अमित ओसवाल (९३.७५ टक्के) उत्तीर्ण झाले. प्रथम आलेल्या रितीका देवडा हिला गणित व वाणिज्य विषयात पैकीच्या पैकी १०० गुण मिळाले आहेत तर इंग्रजीत ९९, अर्थशास्त्र ९८, अकाऊंट ९५ गुण मिळाले आहेत.

तर द्वितीय आलेल्या आत्मन जैन याला गणित विषयामध्ये पैकीच्या पैकी १०० गुण मिळाले. तर इंग्रजीत ९८, केमिस्ट्रीत ९७, फिजीक्स ९६, कॉम्प्युटर ९६ गुण प्राप्त झाले आहेत. तसेच विषयानुसार ९० गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीत २०, वाणिज्यमध्ये ९, अर्थशास्त्र व गणितमध्ये ६, बिजनेस स्टडी ५, फिजिक्स, केमिस्ट्री, कॉम्प्युटर, मानसशास्त्र, कला यात २, बायोलॉजी व अकाउंटमध्ये १ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

कोरोनासारखी महामारी त्यानंतर शैक्षणिक अभ्यासक्रमातील बदल अशा विपरीत परिस्थितीत विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारे प्राप्त केलेले यश गौरवास्पद आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद, शिक्षकतेतर कर्मचारी यांच्यासह पालकांचेही अभिनंदन होत आहे. अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.

अनुभूती स्कूलच्या स्थापनेपासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम असल्याचा आनंद आहे. संपूर्ण देशात सीआयएससीई बोर्डच्या मेरिटमध्ये अनुभूतीची विद्यार्थीनी तिसरी आली, सोबत यशस्वी झालेले विद्यार्थ्यांचे यश कौतूकास्पद आहे. यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकतेतर कर्मचारी, पालकांसह विद्यार्थ्यांचे अभिनंदन!

अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टीम्स

 


 

Next Post
मू.जे. महाविद्यालयातील तबला कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

मू.जे. महाविद्यालयातील तबला कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group