• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पांझरा नदीवरील बाह्मणे जवळील फुटलेल्या साठवण बंधारा होणार दुरुस्ती

आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मिळाली 3 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 31, 2022
in कृषी, जळगाव जिल्हा
0
पांझरा नदीवरील बाह्मणे जवळील फुटलेल्या साठवण बंधारा होणार दुरुस्ती

गजानन पाटील | अमळनेर, दि. ३१- पांझरा नदीवरील बाह्मणे गावाजवळील फुटलेला साठवण बंधारा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असताना आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सुमारे ३ कोटी १ लक्ष,५८ हजार ७५०/-रुपये निधीतून या बंधाऱ्याची दुरुस्ती होणार आहे.

याबाबत प्रशासकीय मान्यतेचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाने ८ मार्च रोजी काढले असून यात धुळे जिल्ह्यातील योजनांच्या दुरुस्तीच्या अंदाज पत्रकाना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच अमळनेर तालुक्यातील बाह्मणे गावाजवळील साठवण बंधाऱ्याचा देखील यात समावेश आहे. तालुक्यातील बाम्हणे, कळंबु, एकलहरे, व परिसरातील ६ ते ८ गावाचा सिंचन व पाण्याचा प्रश्न या बंधाऱ्यावर अवलंबून आहे. मात्र पांझरा नदीला २०१८ मध्ये आलेल्या महापुरामुळे हा बंधारा फुटला.

या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी पांझरा परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत होते. दरम्यान आमदारांनी बाम्हणे ग्रामस्थांना एक महिन्याच्या आत बंधाऱ्यासाठी निधी मंजूर करणार असल्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे आमदारांनी तो शब्द पूर्ण करून दाखविल्याने पांझरा काठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे अनेक गावांच्या

पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटून शेती सिंचनाचा देखील विशेष फायदा होणार आहे. यामुळे सर्वत्र आमदारांचे कौतुक होत आहे. आमदारांनी देखील महाविकास आघाडी शासन व जलसंधारण मंत्र्यांचे विशेष आभार व्यक्त केले.

Next Post
बहुआयामी, अष्टपैलु व्यक्तीमत्व भाईसाहेब सुभाषजी जाधव औक्षवंत व्हा !

बहुआयामी, अष्टपैलु व्यक्तीमत्व भाईसाहेब सुभाषजी जाधव औक्षवंत व्हा !

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add