• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

“स्माईल प्लिज” म्हणत महापौर जयश्री महाजन यांनी छायाचित्रकारांना दिल्या शुभेच्छा

प्रेस फोटोग्राफर फौंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रदिन साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 19, 2021
in सामाजिक
0
“स्माईल प्लिज” म्हणत महापौर जयश्री महाजन यांनी छायाचित्रकारांना दिल्या शुभेच्छा

जळगाव | दि.19- पत्रकारितेसह व्यावसायिक छायाचित्रकारांना संघटित करीत गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिन महापौर जयश्री महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅमेरा पूजन करीत गुरुवारी पत्रकार भवनात साजरा करण्यात आला… यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी महेश देशमुख, पोलीस निरीक्षक के. के. पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अशोक भाटिया व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी व्यसपीठावरून बोलतांना महापौर जयश्री महाजन यांनी “स्माईल प्लिज” म्हणत उपस्थित सर्व छायाचित्रकारांना हसत खेळत अनोख्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे फोटोग्राफर बांधवांच्या विविध उपक्रमासाठी महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या भूखंडाचे सुशोभीकरणासह, मनपा परिसरात छायाचित्रकार बांधवांसाठी प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. महापौर चषक स्पर्धेच्या माध्यमातून फोटोग्राफर बांधवामध्ये स्पर्धात्मक प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न देखील, जळगाव महानगर पालिकेच्या माध्यमातून करण्याचा संकल्प महापौर जयश्री महाजन यांनी यावेळी केला.

संस्थेतर्फे गेल्या दहा वर्षांपासून करण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरीची माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जाणून घेत, संस्थेला ११ हजार रुपयांची देणगी देण्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे आगामी काळात देखील संघटनेच्या विविध उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन देखील उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिले.

छायाचित्रांमुळे इतिहास जपण्यासाठी मोठा उपयोग होतो, त्यामुळे आपण करीत असलेले काम हे खूप मोठे असल्याचे सांगत, उपस्थित छायाचित्रकारांना परिवहन विभागाचे अधिकारी महेश देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान फोटोग्राफी दिनाचा इतिहास व महत्व चंद्रशेखर नेवे यांनी यावेळी समजवून सांगितले. गेल्या वर्षभरात कोरोनासह इतर व्याधींमुळे निधन झालेल्या छायाचित्रकार बांधवांना यावेळी श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित देशमुख तर सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले…

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील, उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिव अभिजित पाटील, सहसचिव संधीपाल वानखेडे, माजी अध्यक्ष सुमित देशमुख, पांडुरंग महाले, जुगल पाटील, धर्मेंद्र राजपूत, भूषण हंसकर, अरुण इंगळे, यांनी प्रयत्न केले… शहरातील अनेक फोटोग्राफर बांधवांची यावेळी उपस्थिती होती….


 

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatखान्देश प्रभातप्रेस फोटोग्राफर फाउंडेशन
Next Post
स्माईल प्लिज” म्हणत महापौर यांनी छायाचित्रकारांना दिल्या शुभेच्छा..- VIDEO

स्माईल प्लिज" म्हणत महापौर यांनी छायाचित्रकारांना दिल्या शुभेच्छा..- VIDEO

ताज्या बातम्या

जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी
खान्देश

जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी

January 18, 2026
“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे
खान्देश

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे

January 17, 2026
आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय
जळगाव जिल्हा

आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय

January 17, 2026
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता
जळगाव जिल्हा

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

January 16, 2026
जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली
जळगाव जिल्हा

जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली

January 15, 2026
जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group