• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 18, 2021
in जळगाव जिल्हा
0
प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव | (जिमाका) दि. 17 – जिल्हा वार्षिक योजनेमधून प्राप्त होणाऱ्या निधीतून पस्तावित कामे विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी विकास कामांचे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. ज्या विभागांना निधी वितरीत करण्यात आला आहे परंतु अद्यापपर्यंत खर्च झाला नसेल, त्यांना पुढील निधी वितरीत करता येणार नाहीत. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सांगितले.

जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संतोष बिडवई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, प्रांताधिकारी प्रसाद मते, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती विनीता सोनवणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, डिगंबर लोखंडे, जिल्हा नियोजनचे डी. एस. पाटील यांचेसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांमधून प्रस्ताव सादर करतांना त्या कामाची आवश्यकता, उपयोगिता व जनहित लक्षात घेऊनच प्रस्ताव सादर करावेत. विकास कामे सुचवितांना बहुउपयोगी कामांवर भर देण्यात यावा. विशेषत: शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेबरोबरच शेतकरी हितास प्राधान्य द्यावे. सुचविलेली कामे विहित वेळेत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर राहील. त्यानुसारच कामांचे नियोजन करावे. मुलभूत बाबींना प्राधान्य राहील याकडे सर्व विभागांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कामे पूर्ण करतांना कामांचा दर्जा व गुणवत्ता तपासावी. जिल्हा परिषदेला मागील आर्थिक वर्षात देण्यात आलेला निधी यावर्षी पूर्ण खर्च होणे आवश्यक आहे. मागील वर्षीच्या स्पीलमधून करावयाची कामे तातडीने पूर्ण होतील याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याचेही त्यांनी सूचित केले.

जळगाव जिल्ह्याला सन 2021-22 मध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 400 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतुद प्राप्त झाली असून 176 कोटी 63 लाख 91 हजार रुपयांचा निधी बीडीएसवर प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी यांचेकडून आतापर्यंत 28 कोटी 78 लाख 59 हजार रुपयांचा निधी विविध विभागांना वितरीत करण्यात आला असून यापैकी 24 कोटी 45 लाख 24 हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यामध्ये अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कोरोना प्रंतिबंधासह इतर विभागांनाही विकास कामांसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. वितरीत तरतुदीशी आतापर्यंत खर्चाची टक्केवारी 84.95 टक्के इतकी असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी बैठकीत दिली.


 

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatखान्देश प्रभातजळगाव
Next Post
तरसोद ते चिखली फोर वे महामार्ग मुदतीच्याआत पूर्ण- VIDEO

तरसोद ते चिखली फोर वे महामार्ग मुदतीच्याआत पूर्ण- VIDEO

ताज्या बातम्या

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group