जळगाव, दि.०२ – वयाच्या सातव्या महिन्यापासून थॅलेसेमिया आजार जडलेल्या ९ वर्षीय बालकावर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात गुंतागुंतीची स्पीलीनेक्टॉमी शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून बाळाच्या आई-वडिलांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
चाळीसगाव येथील रहिवासी असलेला गौरव सुर्यवंशी या बालकाला सात महिन्यांचा होता, तेव्हापासून थॅलेसेमिया आजार जडला. बालकाचा ब्लडगृप ओ पॉझीटिव्ह असून सतत रक्त कमी होण्याची समस्या बालकाला उद्भवत होती. परिणामी बालकाच्या शरिरातले रक्ताचे प्रमाण कमी होवून झटके येणे, श्वासोच्छवासास त्रास झाल्याने नातेवाईकांनी त्याला जळगाव येथील सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल केले, तेथून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले.
स्पीलीनेक्टॉमीद्वरे मृत रक्तपेशी बाहेर
बालकाच्या शरिरात ५.५ हिमोग्रॅम असल्याने सर्वप्रथम बालकाला दोन ते तीन बॅग्ज रक्त देण्यात आले. यावेळी ८.५ इतके एचबी झाले झाले. त्यानंतर डॉ.मिलींद जोशी, रेसिडेंट डॉ.श्रीयश सोनवणे, डॉ.वरुणदेव एस यांनी स्पीलीनेक्टॉमी ही शस्त्रक्रिया केली, त्यांना भुलतज्ञ डॉ. काशिनाथ महाजन यांचे सहकार्य लाभले.
पीआयसीयूत देखभाल
तब्बल दोन तासाची शस्त्रक्रिया आटोपल्यावर बालकाला पीआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. येथे बालरोग तज्ञ डॉ.उमाकांत अणेकर, डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.सुयोग तन्नीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली रेसिडेंट डॉ.सुरुची शुक्ला, डॉ.प्रज्ञिल रांगणेकर, डॉ.भारती झोपे, हिरामण धनगर यांनी देखभाल केली.
स्प्लेनेक्टॉमी म्हणजे काय ?
स्प्लेनेक्टॉमी ही व्यक्तीची प्लीहा काढून टाकण्याची शस्त्रक्रिया आहे. प्लीहा हा एक अवयव आहे जो पोटाच्या वरच्या डाव्या बाजूला बरगडीखाली बसतो. हे संक्रमणाशी लढण्यास मदत करते आणि रक्तातील जुन्या किंवा खराब झालेल्या रक्तपेशींसारखी अनावश्यक सामग्री फिल्टर करते.