गजानन पाटील | अमळनेर | स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे शासकीय आश्रम शाळेत माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सिमा पारधी, लोक संघर्ष मोर्चा तथा आदिवासी पारधी विकास परिषदेचे नेते पन्नालाल मावळे यांनी अमृत महोत्सवाचा ध्वजारोहणाचा सन्मान सैनिकालाच देण्यात यावा असा निर्णय घेतला. माजी उपसरपंच प्रविण माळी, अनिल माळी, मुख्याध्यापक शिरसाठ यांच्याशी चर्चा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले सैनिक हर्षवर्धन वासुदेव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे ठरले. स्वातंत्र्य दिनी शासकीय आदिवासी आश्रम शाळेत सेवानिवृत्त सैनिक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सकाळी ७-३० वा. ध्वजारोहण करण्यात आले व त्या नंतर त्यांच्या सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा सह लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे पन्नालाल मावळे व शासकीय आदिवासी आश्रम शाळेतर्फे मुख्याध्यापक शिरसाठ सर यांनी शाल श्रीफळ देऊन सेवानिवृत्त सैनिकाचा सत्कार केला.
या वेळी दहिवदचे माजी उपसरपंच प्रविण माळी, अनिल माळी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सिमा पारधी, सभासद भुलसिंग पावरा, शिवाजी पारधी, मुख्याध्यापक शिरसाठ सर, अधिक्षक तांदळे सर, शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.