• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

उतारावरून भरधाव आलेल्या आयशर टेम्पोची बसथांब्यावर विद्यार्थ्यांना धडक; दोघे गंभीर जखमी, चालक पोलिसांच्या ताब्यात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 27, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

जळगाव , प्रतिनिधी  : पुण्यातील बोपदेव घाट परिसरात बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) दुपारी भीषण अपघात झाला. उतारावरून भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने बसस्थानकावर उभ्या असलेल्या ट्रिनिटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत जळगावच्या मोहिनी चौधरी हिच्यासह तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे जळगाव शहरात शोककळा पसरली आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे सिद्धेश जयप्रकाश राजे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), विशाल सुनील दांगडे (रा. जे. पी. नगर, किरकटवाडी फाटा, नांदेड-सिंहगड रोड) आणि मोहिनी जितेंद्र चौधरी (रा. कामठे वस्ती, हडपसर, साधना विद्या मंदिरजवळ, मूळ रा. चंदू अण्णा नगर, जळगाव) अशी आहेत.

तर सोहम घंगाळे (रा. राजुरी, ता. जुन्नर) आणि श्वेता यशवंत तळेकर (रा. रामनगर, रामटेकडी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सोहम याच्यावर इनामदार रुग्णालयात, तर श्वेता हिच्यावर रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो (एमएच ०४ एफडी ७६५४) याने प्रथम हुंडाई व्हेन्यू कारला (एमएच १२ वायएन ३२४७) पाठीमागून धडक दिली. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट बसथांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या दिशेने गेला. या भीषण धडकेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक प्रतीक मारुती चव्हाण (वय २२, रा. घुलेश्वर, माळशिरस, ता. पुरंदर) याला ताब्यात घेतले आहे. येवलेवाडी पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

जळगावच्या मोहिनी चौधरी हिच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच तिच्या कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.


 

ताज्या बातम्या

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
खान्देश

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

November 27, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
खान्देश

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

November 27, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवशाही बसमध्ये महिलेच्या बॅगेतून ४.६३ लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2026
जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी
खान्देश

जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी

November 27, 2026
दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर
आरोग्य

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर

November 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add