• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

आजोबांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीय पुण्याला गेले असताना चोरट्यांचा डल्ला; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 27, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील रझा कॉलनी परिसरात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. घरातील कुटुंबीय आजोबांच्या अंत्यविधीसाठी पुण्याला गेलेले असताना चोरट्यांनी ही संधी साधली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रझा कॉलनीतील रहिवासी मोहम्मद सुफियान गुलाम नबी (वय ४१) यांच्या आजोबांचे निधन झाल्यामुळे ते २३ नोव्हेंबर रोजी आई व मुलीसह पुणे येथे अंत्यविधीसाठी गेले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, १५ ग्रॅमचे सोन्याचे झुमके, १५ ग्रॅम सोन्याचा तुकडा आणि ७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असा एकूण ५ तोळे २ ग्रॅम वजनाचा, १ लाख ५६ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेला.

२४ नोव्हेंबर रोजी सकाळी मोहम्मद सुफियान यांच्या पत्नीच्या लक्षात घरफोडीचा प्रकार आला. त्यांनी याबाबत पतीला माहिती दिली. त्यानंतर घरी आलेल्या मोहम्मद सुफियान यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील करीत आहेत.


 

Next Post
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
खान्देश

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

November 27, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवशाही बसमध्ये महिलेच्या बॅगेतून ४.६३ लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2026
जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; बालचमूंसाठी चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी
खान्देश

जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; बालचमूंसाठी चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी

November 27, 2026
दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर
आरोग्य

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर

November 26, 2026
शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद
गुन्हे

शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद

November 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add