• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

दोन दिवसांत ५० हजारांहून अधिक भाविकांनी घेतले भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन; दोन तासांत ३३ अभिषेक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

जळगाव, प्रतिनिधी : निवृत्तीनगर येथील केरळी महिला ट्रस्टच्या अय्यप्पा स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमा व कृत्तिका नक्षत्राच्या पावन पर्वानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यंदा कृत्तिका नक्षत्राचा कालावधी अधिक असल्याने मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता मंदिराचे द्वार उघडल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली. २४ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजेपर्यंत जवळपास ५० हजारांहून अधिक भाविकांनी भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

मंदिराचे द्वार उघडल्यानंतर रात्री ९.३० ते ११.३० या दोन तासांच्या कालावधीत ३३ अभिषेक करण्यात आले. मंदिराच्या अध्यक्षा श्रीमती वासंती अय्यर आणि मंदिराचे पुजारी कृष्णमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली वेदमूर्ती पाठक गुरुजी गोविंद तिवारी यांनी मंत्रोच्चारात पूजाविधीला प्रारंभ केला. यावेळी केरळी महिला ट्रस्टचे सर्व सदस्य उपस्थित होते.

दोन किलोमीटरपर्यंत दर्शनासाठी रांग..
यंदा कृत्तिका नक्षत्राचा शुभयोग अधिक काळ असल्याने भाविकांचा उत्साह विशेष होता. दर्शनासाठी मंदिर परिसरापासून जवळपास दोन किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. मंदिरासमोर अभिषेकासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाविकांना त्यांच्या मनोकामना पूर्ण होण्यासंदर्भात धार्मिक मार्गदर्शनही करण्यात येत होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कपाळावर टिळा लावून चण्याचा प्रसाद देण्यात येत होता.

रात्री १२.३० वाजता मंदिराचे द्वार बंद करण्यात आले. संपूर्ण उत्सवादरम्यान मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. केरळी महिला ट्रस्टच्या सदस्यांनी दर्शन व पूजेच्या व्यवस्थेसाठी विशेष परिश्रम घेतले.


 

Next Post
अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास
गुन्हे

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास

November 25, 2026
कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!
जळगाव जिल्हा

कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

November 25, 2026
ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई
क्रिडा

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

November 25, 2026
शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला
Uncategorized

शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला

November 25, 2026
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी
जळगाव जिल्हा

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी

November 25, 2026
होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन

November 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add