• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डंका

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 25, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

जळगाव, प्रतिनिधी : पंजाबमधील अमृतसर येथील गुरू नानक देव विद्यापीठात पार पडलेल्या ‘ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप २०२६’ स्पर्धेत जळगावची सुकन्या आकांक्षा म्हेत्रे हिने चमकदार कामगिरी करत दोन रौप्यपदकांची कमाई केली आहे.

या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. ती जैन इरिगेशनचे सहकारी जी. एम. म्हेत्रे यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी विशेष कौतूक केले.

१८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मुलींच्या गटातील वैयक्तिक ‘टाईम ट्रायल’ प्रकारात आकांक्षाने अत्यंत वेगवान कामगिरी करत पहिले रौप्यपदक पटकावले. हाच विजयी फॉर्म कायम राखत तिने दुसऱ्या दिवशी झालेल्या ‘टीम स्प्रिंट’ प्रकारातही आपल्या संघासह दुसऱ्या रौप्यपदकावर नाव कोरले.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी झालेल्या ‘केरिन’ (Keirin) प्रकारातही आकांक्षाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारत कडवी झुंज दिली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत तिचे पदक थोडक्यात हुकले आणि तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. राष्ट्रीय स्तरावर दोन रौप्यपदके जिंकून जळगावचा आणि पुणे विद्यापीठाचा नावलौकिक उंचावल्याबद्दल क्रीडा वर्तुळातून आकांक्षाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


 

Next Post
कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास
गुन्हे

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास

November 25, 2026
कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!
जळगाव जिल्हा

कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

November 25, 2026
ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई
क्रिडा

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

November 25, 2026
शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला
Uncategorized

शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला

November 25, 2026
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी
जळगाव जिल्हा

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी

November 25, 2026
होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन

November 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add