चाळीसगाव, प्रतिनिधी : चाळीसगाव शहरातील गजानन हॉस्पिटलसमोरील सार्वजनिक पार्किंगमधून एक लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी पाटबंधारे विभागात कार्यरत असलेले किशोर तुकाराम टकले (वय ४७, रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने त्यांच्याजवळील एक लाख रुपयांची रोकड लंपास केली.

या घटनेप्रकरणी १८ नोव्हेंबर रोजी रात्री चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीमागे कोण आहे, तसेच रोकड नेमकी कशा प्रकारे चोरीस गेली, याबाबत अधिक तपशील उपलब्ध नसून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.









