• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 6, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरातील मूलभूत सोयी-सुविधांचा विकास आणि नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत जळगाव महानगरपालिकेसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या योजनेंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

जळगाव शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांना निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शहराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या निधीतून जळगाव शहरातील १९ प्रभागांमधील विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. यासोबतच शहरातील प्रमुख प्रवेशमार्गांवर प्रकाशव्यवस्था उभारण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार असून, नागरिकांना अधिक सुरक्षित व सुविधाजनक वातावरण उपलब्ध होईल.

जळगाव शहराचा सर्वांगीण विकास हा आपला प्राधान्याचा विषय असून, शहरातील विविध भागांतील उर्वरित विकासकामांसाठीही भविष्यात शासनाकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. तसेच शहरातील प्रलंबित रस्ते विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठीही संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे.

शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास, दर्जेदार रस्ते, मूलभूत नागरी सुविधा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच आमचे ध्येय आहे. जळगावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी भूमिका आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी व्यक्त केली.


 

ताज्या बातम्या

जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव जिल्हा

जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

November 6, 2026
जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
खान्देश

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
स्वच्छता कामे, गटारीच्या विकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश
खान्देश

स्वच्छता कामे, गटारीच्या विकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश

November 5, 2026
कासोदा पोलिसांची दिवाळीपूर्वी नागरिकांना भेट; १० गहाळ मोबाईल परत
गुन्हे

कासोदा पोलिसांची दिवाळीपूर्वी नागरिकांना भेट; १० गहाळ मोबाईल परत

November 5, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक
खान्देश

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक

November 5, 2026
दिवाळी पाडव्याला महात्मा गांधी उद्यानात रंगणार ‘पाडवा पहाट’
खान्देश

दिवाळी पाडव्याला महात्मा गांधी उद्यानात रंगणार ‘पाडवा पहाट’

November 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add