• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 29, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0

दिवाळीत रात्री १० वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

१२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी; शांतता क्षेत्रात फटाके वाजवल्यास कारवाईचा इशारा

जळगाव (विशेष प्रतिनिधी): दिवाळी सणाच्या काळात ध्वनी व हवा प्रदूषणामुळे होणारे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फटाके वाजविण्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी या निर्देशांचे तंतोतंत पालन करून दिवाळी सण सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.

पर्यावरण (संरक्षण) नियमांमधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. नियमांनुसार दिवाळीत फटाके वाजवण्यासाठी सायंकाळी ६ ते रात्री १० ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत फटाके वाजवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये यांच्या सभोवतालच्या शंभर मीटर परिसराला शांतता क्षेत्र घोषित करण्यात आले असून या भागात कोणत्याही वेळेत फटाके वाजवण्यास सक्त मनाई आहे.

फटाका उडविण्याच्या ठिकाणापासून चार मीटर अंतरावर शंभर पंचविसापेक्षा जास्त डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या साखळी फटाक्यांच्या वापरावरही बंदी असेल. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे किंवा नियमबाह्य साखळी फटाके आढळून आल्यास ते जप्त करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ध्वनी आणि हवा प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षण संस्थांनी विविध उपक्रम राबवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार किंवा अपघात घडू नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचे नियोजन केले आहे. नागरिकांनी फटाके वाजवताना पुरेशी काळजी घ्यावी, न्यायालयाच्या व प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे आणि आनंददायी तसेच सुरक्षित दिवाळी साजरी करावी, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.


 

ताज्या बातम्या

खान्देश

October 29, 2026
महापौरांच्या पाहणीत वॉर्ड ११ मधील समस्यांचा पाढा
खान्देश

महापौरांच्या पाहणीत वॉर्ड ११ मधील समस्यांचा पाढा

October 28, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

भडगावच्या तहसीलदार दुचाकी अपघातात जखमी; अवैध वाळू उपसा कारवाई दरम्यान घडली घटना

October 28, 2026
पाळधी रेल्वे पुलावर आयशरची दुचाकीला धडक; नवविवाहित तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी रेल्वे पुलावर आयशरची दुचाकीला धडक; नवविवाहित तरुणाचा मृत्यू

October 28, 2026
मेहरुणमधील जागेची बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर नोंदणी
Uncategorized

मेहरुणमधील जागेची बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर नोंदणी

October 28, 2026
कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चालकाला अटक
गुन्हे

कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चालकाला अटक

October 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add