• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

अनुभूती शाळा व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे १४ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम ,बालकलाकारांना सहभागी होण्याचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 24, 2026
in Uncategorized, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

जळगाव, प्रतिनिधी : बालकांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद फुलविण्यासोबतच त्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुभूती बालनिकेतन आणि माणुसकी सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन बालकलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमात ४ ते १३ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. गायन, वाद्य वादन, नृत्य, नाट्यछटा, नाटिका आणि एकपात्री अभिनय अशा विविध कलाप्रकारांतून बालकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे. एकल तसेच सामूहिक स्वरूपात सादरीकरण करता येणार असल्याने मुलांना आपल्या आवडीनुसार सहभाग नोंदविता येईल.

बालकांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, आत्मविश्वास वाढावा आणि कलेच्या माध्यमातून त्यांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे.

या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बालकलाकारांनी २५ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी शुभदा नेवे ८३२९३७५०५७ यांच्या शी संपर्क साधावा.


 

Next Post
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर

October 24, 2026
अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!
Uncategorized

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

October 24, 2026
धूळखात पडलेली वाहने हटविण्याचे आदेश; गटारींच्या सफाईसाठी महापौरांचे कडक निर्देश
जळगाव जिल्हा

धूळखात पडलेली वाहने हटविण्याचे आदेश; गटारींच्या सफाईसाठी महापौरांचे कडक निर्देश

October 24, 2026
पाळधीजवळ भीषण अपघात ! १०० फूट उंचीवरून क्रेन कोसळली; चालकाचा मृत्यू
Uncategorized

पाळधीजवळ भीषण अपघात ! १०० फूट उंचीवरून क्रेन कोसळली; चालकाचा मृत्यू

October 24, 2026
जळगाव जिल्ह्यात २४ व २५ ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात २४ व २५ ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे

October 24, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज; मजुरांना रोजगार देण्यासाठी उपाययोजना
गुन्हे

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज; मजुरांना रोजगार देण्यासाठी उपाययोजना

October 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add