जळगाव, प्रतिनिधी : पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, पाळधी गावाजवळ रेल्वे उड्डाणपुलाच्या कामादरम्यान भीषण दुर्घटना घडली. साईड गर्डरचा मोठा तुकडा उचलण्याचे काम सुरू असताना क्रेन अंदाजे १०० फूट उंचीवरून खाली कोसळली. या भीषण अपघातात क्रेन चालक मधुकर धनराज पाटील यांचा मृत्यू झाला.

पाळधी गावाजवळ रेल्वे उड्डाणपुलाच्या साईड गर्डरचा मोठा भाग उचलण्याचे काम सुरू होते. याचदरम्यान क्रेन अचानक उंचीवरून खाली कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली. या दुर्घटनेत क्रेन चालक मधुकर धनराज पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.

दरम्यान, पाळधी-तरसोद बायपास महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.








