• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

किरण चेतन तळेले यांना लेवा भ्रातृ मंडळ, पुणेतर्फे २५,००० शैक्षणिक मदत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 23, 2026
in Uncategorized, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
किरण चेतन तळेले यांना लेवा भ्रातृ मंडळ, पुणेतर्फे २५,००० शैक्षणिक मदत

जळगाव, प्रतिनिधी : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लेवा भ्रातृ मंडळ, पुणे यांच्या वतीने गोदावरी फाउंडेशन, गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जळगाव येथील प्रथम वर्ष डिप्लोमा विद्यार्थी किरण चेतन तळेले यांना २५,००० ची शैक्षणिक आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.

ही मदत कै. एन. एस. पिंपळे स्मृती शैक्षणिक सहाय्य योजना अंतर्गत देण्यात आली.या आर्थिक सहाय्यामुळे किरण यांना शैक्षणिक खर्च भागविण्यास आणि आपले शिक्षण अधिक आत्मविश्वासाने सुरू ठेवण्यास मदत होणार आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

कै. एन. एस. पिंपळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, श्री. पिंपळे सर यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू करण्यात आली आहे. लेवा भ्रातृ मंडळ, पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या या योजनेद्वारे आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.या वेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डिप्लोमा समन्वयक प्रा. दीपक झांबरे, डिप्लोमा विभागातील प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील यांनी लेवा भ्रातृ मंडळ, पुणे यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करण्याच्या कार्याचे विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे आर्थिक अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांना आपली शैक्षणिक स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळते, असे त्यांनी नमूद केले. तसेच प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील आणि डिप्लोमा समन्वयक प्रा. दीपक झांबरे यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

गोदावरी फाउंडेशन गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जळगाव यांच्या वतीने लेवा भ्रातृ मंडळ, पुणे यांचे या मोलाच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. तसेच किरण चेतन तळेले यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आज विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेले सहकार्य हे उद्याच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी ठरते.


 

Next Post
डीयूपीएमसीच्या ऋग्वेद देशपांडे, जान्हवी अर्धापूरकर  यांची विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड

डीयूपीएमसीच्या ऋग्वेद देशपांडे, जान्हवी अर्धापूरकर  यांची विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा! विद्यमान चेअरमन सह दहा संचालक निवडणुकी बाहेर

October 24, 2026
अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!
Uncategorized

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

October 24, 2026
धूळखात पडलेली वाहने हटविण्याचे आदेश; गटारींच्या सफाईसाठी महापौरांचे कडक निर्देश
जळगाव जिल्हा

धूळखात पडलेली वाहने हटविण्याचे आदेश; गटारींच्या सफाईसाठी महापौरांचे कडक निर्देश

October 24, 2026
पाळधीजवळ भीषण अपघात ! १०० फूट उंचीवरून क्रेन कोसळली; चालकाचा मृत्यू
Uncategorized

पाळधीजवळ भीषण अपघात ! १०० फूट उंचीवरून क्रेन कोसळली; चालकाचा मृत्यू

October 24, 2026
जळगाव जिल्ह्यात २४ व २५ ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात २४ व २५ ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे

October 24, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज; मजुरांना रोजगार देण्यासाठी उपाययोजना
गुन्हे

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज; मजुरांना रोजगार देण्यासाठी उपाययोजना

October 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add