• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

नवरात्रौत्सवानिमित्त डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणावर रंगला दांडीया

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 20, 2026
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे दोन दिवसीय ‘गरबा नी गूंज- दांडिया नाईट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक गरबा वेशभूषा परिधान करून संगीताच्या तालावर गरबा आणि दांडियाचे आकर्षक सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डॉ. अनिकेत पाटील आणि डॉ. सुहास बोरले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने फेटे बांधून स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि नवदुर्गा आरतीने कार्यक्रमाचा मंगलमय प्रारंभ झाला.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर, उपप्राचार्या प्रा. जॅसिंथ धाया आणि प्रा. अश्विनी वैद्य उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंदही उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून कार्यक्रमाचा आनंद घेतला. महाविद्यालयाचा परिसर आकर्षक रोषणाई आणि पारंपरिक सजावटीने सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या नृत्यकौशल्याचे, ऊर्जेचे आणि सांघिक भावनेचे दर्शन घडविले.

या कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट गरबा सादरीकरणासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच ‘गरबा रील स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली होती. विजेत्यांना प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या कलागुणांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन स्नेहल जांभुळकर, दिव्याना पवार, मंजिरी मडावी, सूरज खवाटे आणि सुमित भरांबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अरुण चौधरी आणि गणेश नांदुरकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे, सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे, आत्मविश्वास वाढविणे आणि सांघिक भावना वृद्धिंगत करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.


 

Next Post
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

जळगावमध्ये 'श्री दुर्गामाता महादौड' उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न
जळगाव जिल्हा

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न

October 20, 2026
पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

October 19, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
आरोग्य

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा
खान्देश

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

October 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add