जळगाव, प्रतिनिधी : श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे मंगळवारी (दि. २०) विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्रपूजन व ध्वजपूजन सोहळा उत्साहात पार पडला. शस्त्रपूजन परंपरेचे मंडळाचे यंदाचे हे ४३ वे वर्षे होते. सुरुवातीला ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात मान्यवरांच्या हस्ते विधिवत शस्त्रपूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी ध्वजस्तंभाचे पूजन करून उपस्थितांना व परस्परांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

विजयादशमीनिमित्त ही ऐतिहासिक परंपरा सातत्याने जोपासण्याचे कौतुकास्पद काम केल्याबद्दल सर्वच मान्यवरांनी मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांचे विशेष आभार मानले व कौतुक केले.

या सोहळ्यास खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी मोघे, डॉ. राधेश्याम चौधरी, विष्णू भंगाळे, प्रकाश बालाणी, सागर सोनवणे, भालचंद्र पाटील, भरत अमळकर, ॲड. विपिन पाटील, दिलीप गांधी, शैलेश ठाकरे, संदीप रडे, अतुल हाडा आणि नेहरू चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.









