• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 17, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

​जळगाव, प्रतिनिधी : शहरात मोटार सायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात एमआयडीसी पोलिसांना मोठे यश आले आहे. जळगावमधील तांबापुरा आणि रामनगर परिसरातून दुचाकी लांबवणाऱ्या एका सराईत चोरट्याला गुन्हे शोध पथकाने शिताफीने ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीला गेलेल्या दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास तांबापुरा येथील अजमेरी गल्लीतून ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि रामनगरमधील डी मार्ट समोरील परिसरामनून ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अशी एकूण ८५ हजार रुपये किमतीची वाहने चोरट्यांनी लांबवली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

​गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास चक्रे वेगाने फिरवून सोनू उर्फ साहिल मोहम्मद तडवी (वय २३, रा. मच्छी बाजार, जळगाव) या संशयित आरोपीस ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आणि त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

​सदर यशस्वी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पो.उप.नि. विजयसंग पाटील, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, गिरीश पाटील, मोतीलाल बोरसे, किरण पाटील, शशिकांत मराठे, रमाकांत साळुंखे आणि गणेश ठाकरे यांच्या पथकाने पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार करीत आहेत.

Next Post
भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add