जळगाव, प्रतिनिधी : अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेल्या ‘शिल्प हॉस्पिटल’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’ या दोन्ही रुग्णालयांचा संयुक्त शुभारंभ शनिवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. दरम्यान शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. श्रीराज महाजन यांनी माहिती दिली.

शिल्प हॉस्पिटलमधील सुविधा:
प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी: ट्रॉमा (अपघात), हाताचे टेंडन व रक्तवाहिन्यांच्या दुखापती, जन्मजात व्यंग, कॅन्सरच्या जखमा, हेअर ट्रान्सप्लांट, कॉस्मेटिक सर्जरी, स्तन व नाकाची सुबक शस्त्रक्रिया, चरबी कमी करणे, भाजल्यानंतरचे व्रण आणि व्हेरिकोझ व्हेंसवर (पायांच्या फुगलेल्या नसा) उपचार. त्वचारोग व लेझर विभाग: सर्व प्रकारच्या त्वचारोगांवर व केशविकारांवर अत्याधुनिक लेझर उपचारांची सुविधा.

खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील सुविधा:क्रिटिकल व सुपरस्पेशालिटी केअर: अत्याधुनिक आयसीयू विभाग, ट्रॉमा व अपघात उपचार, शस्त्रक्रिया विभाग आणि अस्थिरोग विभाग. तसेच हृदयरोग विभागांतर्गत अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी, न्यूरोसर्जरी, युरोलॉजी आणि मेंदूविकारांवरील सर्व सुपरस्पेशालिटी सर्जरी उपलब्ध आहेत.

या अत्याधुनिक यंत्रसामग्रीयुक्त रुग्णालयांच्या शुभारंभ सोहळ्यास जळगावकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. श्रीराज महाजन व डॉ. सुभा महाजन यांनी केले आहे.








