• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

मानसी भोईटे व अरविंद देशमुख यांचे सहकार्य

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 16, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

जळगाव, (प्रतिनिधी) : पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाचा जळगाव शहरातील सर्व पत्रकार बांधवांसाठी विशेष शो आयोजित करण्यात आला आहे. शहरातील सर्व पत्रकार संघटना एकत्र येऊन पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम पत्रकार मित्र मंडळाच्या माध्यमातून या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २:४५ वाजता जळगाव शहरातील नटवर कॉम्प्लेक्स येथील पीव्हीआर सिनेमागृहात हा विशेष शो होणार आहे. या उपक्रमाला जळगाव महानगरपालिकेच्या नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या मानसी निलेश भोईटे आणि नगरसेवक अरविंद देशमुख यांचे सहकार्य लाभले आहे. या विशेष चित्रपट प्रदर्शनासाठी पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. अनिकेत निकम स्वतः उपस्थित राहणार आहेत.

मुंबईवरील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका देशाच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान मानली जाते. देशाच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱ्या दहशतवादी कारवायांशी संबंधित खटल्यांमध्ये त्यांनी न्यायालयासमोर मांडलेली प्रभावी बाजू देशवासीयांच्या स्मरणात कायम राहणारी आहे.

जळगाव शहरातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन या विशेष चित्रपट प्रदर्शनाचा पुढाकार घेतला आहे. या विशेष प्रदर्शनाचा लाभ शहरातील सर्व पत्रकार बांधवांनी घ्यावा, असे आवाहन पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम पत्रकार मित्र मंडळ व शहरातील सर्व पत्रकार संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add