• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ६ शहरांत शोधमोहीम; अकोल्यातील २८ वर्षीय संशयिताला अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 12, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : मुक्ताईनगर शहरातून चोरीला गेलेले तेवरा वाहन शोधून काढण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेत पोलिसांनी भुसावळ, जामनेर, पहूर, सिल्लोड आणि शेगावमार्गे अमरावतीपर्यंत तपास केला. अखेर अमरावती शहरातील नवसारी परिसरातून चोरीचे वाहन हस्तगत करून मोहम्मद मुहसिर मोहम्मद युनूस (वय २८, मूळ रा. अकोला) याला ताब्यात घेत अटक करण्यात आली.

मुक्ताईनगर शहरातील अक्सानगर परिसरातून ३ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजेपासून ४ ऑक्टोबरच्या सकाळी ७ वाजेदरम्यान तेवरा कंपनीचे एमएच-१९/बीसी-००९२ क्रमांकाचे वाहन चोरीला गेले होते. वाहनधारक शेख दानिश शेख साबीर यांनी याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ४०९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून चोरीचे वाहन मुक्ताईनगरहून भुसावळच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भुसावळ, कुऱ्हा पानाचे, जामनेर, पहूर, सिल्लोड आणि खामगाव परिसरातील प्रमुख मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.

वाहनाचा माग काढत पोलीस पथक शेगाव शहरात पोहोचले. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरीचे वाहन श्री गजानन महाराज संस्थानच्या पार्किंग परिसरात सुमारे पाच तास उभे असल्याचे आढळले. पुढील तपासात हे वाहन अमरावती शहरात प्रवेश करत असल्याचे दिसून आले. मात्र, शहरातून बाहेर पडणाऱ्या मार्गांवरील उपलब्ध फुटेजमध्ये वाहन आढळले नाही. त्यानंतर अमरावतीतील गाडगेनगर पोलिसांची मदत घेण्यात आली. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने अभिलेखावरील गुन्हेगारांची चौकशी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर नवसारी परिसरात एका ठिकाणी चोरीचे वाहन उभे असल्याचे पोलिसांना आढळले.

पोलिसांनी वाहनावर पाळत ठेवली असता मोहम्मद मुहसिर मोहम्मद युनूस हा वाहनात बसलेला आढळला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. तो अकोला शहरातील उत्तमचंद प्लॉट, तारफाईल येथील रहिवासी असून सध्या अमरावतीतील वलगाव रोडवरील पॅराडाइज कॉलनी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयिताविरुद्ध अकोला शहरासह परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मुक्ताईनगरमधील वाहन चोरीच्या प्रकरणात त्याचा सहभाग आणि इतर संभाव्य गुन्ह्यांबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कल्पेश आमोदकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल असीम तडवी, पोलीस कर्मचारी मुकेश महाजन, रितेश चव्हाण, स्वप्निल पवार आणि अक्षय वाढे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने मागोवा घेत अनेक शहरांमधून चोरीच्या वाहनाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस करीत आहेत.


 

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add