• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 8, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

भुसावळ, प्रतिनिधी : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ अंडर-१७ मुलांच्या बॅडमिंटन संघाने तालुकास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या यशामुळे संघाची आगामी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा जळगाव येथे होणार आहे.

तापी पब्लिक स्कूल, भुसावळ येथे तालुकास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडियम स्कुल भुसावळच्या अंडर-१७ मुलांच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. उत्कृष्ट सर्व्हिस, वेगवान स्मॅश, अचूक शॉट्स तसेच प्रभावी बचावाच्या जोरावर संघाने प्रतिस्पर्धी संघांवर मात करत प्रथम क्रमांक मिळविला.

या विजयामुळे डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडियम स्कुल भुसावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून आता संघ जळगाव येथे होणार्‍या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत भुसावळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच शाळेच्या क्रीडा विभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. सौ. वर्षा पाटील, डॉ. सौ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील तसेच मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी विजयी खेळाडू, प्रशिक्षक आणि संपूर्ण संघाचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, चिकाटीचे आणि शिस्तबद्ध सरावाचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही शाळेची सातत्यपूर्ण भूमिका आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघाने यापुढेही अशीच उत्कृष्ट कामगिरी करावी, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. अंडर-१७ बॅडमिंटन संघाच्या या यशाबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षक व क्रीडाप्रेमींमधून कौतुक होत आहे.

Next Post
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

October 8, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add