• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

देशभरातील १५ संघांचे २७० खेळाडूंचा सहभाग; २५ सामने रंगणार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 4, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

जळगाव, प्रतिनिधी : अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाआतील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२६ स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन रविवारी (दि. ४) अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडांगणावर झाले. देशभरातील १५ संघांचे २७० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून, दि. ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान साखळी व बाद पद्धतीने सामने खेळविले जाणार आहेत.

उद्घाटनप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य तथा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबाशीस दास, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे यांच्यासह ज्योती जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अशोक जैन यांच्या हस्ते अनुभूती निवासी स्कूलचा ध्वज फडकाविण्यात आला. विद्यार्थिनींनी ‘अब मुश्किल नहीं…’ हे स्वागतगीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एरोबिक्सच्या सामूहिक नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. स्पर्धेतील सर्व संघांनी मार्चपास्ट करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

अशोक जैन व अतुल जैन यांच्या हस्ते कृति ओसवाल हिच्याकडे क्रीडा मशाल सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर मशाल रन झाली. राष्ट्रीय क्रिकेटपटू अन्मय जैन, रणवीर राणा, कृति ओसवाल यांच्यासह खेळाडूंनी क्रीडाज्योत प्रज्वलित केली. प्राचार्य देबाशीस दास यांनी सहभागी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली.

यावेळी अतुल जैन यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना सांगितले की, “सांघिक भावनेने क्रिकेटचा आनंद घ्या. खेळातील विजय-पराभव महत्त्वाचा असला तरी या स्पर्धेतून मिळणाऱ्या चांगल्या आठवणी आयुष्यभर स्मरणात राहतील.”

१५ संघांतील २७० खेळाडूंचा सहभाग..
सीआयएससीई बोर्डच्या १७ वर्षाआतील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत आंध्रप्रदेश-तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर-पश्चिम भारत, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार-झारखंड, उत्तर भारत, ईशान्य भारत, केरळ, कर्नाटक-गोवा, छत्तीसगड तसेच तमिळनाडू-पुद्दुचेरी-अंदमान निकोबार या १५ संघांचा सहभाग आहे. अनुभूती निवासी स्कूल ही या स्पर्धेची मुख्य आयोजक असून, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकार्य लाभत आहे.

२१ साखळी सामन्यांसह एकूण २५ सामने..
स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये प्रत्येकी १५ षटकांचे सामने खेळविले जातील. उपांत्य व अंतिम सामने प्रत्येकी २० षटकांचे असतील. चार गटांमध्ये विभागलेल्या संघांमध्ये एकूण २१ साखळी सामने होतील. त्यानंतर दोन उपांत्य सामने, अंतिम सामना आणि तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना खेळविला जाणार आहे. उपांत्य फेरीत ‘अ’ गटातील संघाचा ‘ड’ गटातील संघाशी, तर ‘ब’ गटातील संघाचा ‘क’ गटातील संघाशी सामना होईल. विजेते संघ अंतिम सामन्यात, तर पराभूत संघ तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात आमनेसामने येतील.

अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल, जैन ड्रीम स्पेस-मेहरुण तलावाजवळील मैदान तसेच एमके स्पोर्ट्स-सावखेडा येथील मैदानांवर हे सामने रंगणार आहेत. देशभरातून आलेल्या युवा क्रिकेटपटूंच्या कौशल्याचा थरार जळगावकरांना अनुभवता येणार आहे.


 

Next Post
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
खान्देश

पार्किंगमधून एक लाखांची रोकड लंपास

November 20, 2026
जळगाव जिल्हा पोलीस दलात खांदेपालट; तीन प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Uncategorized

जळगाव जिल्हा पोलीस दलात खांदेपालट; तीन प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या

November 20, 2026
पिस्तुल घेऊन दहशत माजविणारा जेरबंद
गुन्हे

पिस्तुल घेऊन दहशत माजविणारा जेरबंद

November 20, 2026
५० लाखांच्या विमा रक्कम लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० जणांविरुद्ध गुन्हा
खान्देश

५० लाखांच्या विमा रक्कम लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० जणांविरुद्ध गुन्हा

November 20, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या आठ खेळाडूंची अ. भा. तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड!
क्रिडा

गोदावरी अभियांत्रिकीच्या आठ खेळाडूंची अ. भा. तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड!

November 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी
Uncategorized

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add