• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी फाउंडेशनच्या भव्य सत्काराने कुलगुरू डॉ. गिते भारावले

आरोग्य क्षेत्रातील गोदावरीच्या कार्याचे केले कौतुक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
गोदावरी फाउंडेशनच्या भव्य सत्काराने कुलगुरू डॉ. गिते भारावले

जळगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. व्यंकटराव शाहुबाई अर्जुनराव गिते यांचा जळगाव शहरातील संभाजी नाट्यगृह येथे विविध आरोग्य संस्थांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी गोदावरी फाऊंडेशन संचलित आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांच्या वतीने डॉ. गिते यांचा विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.या भव्य सत्काराने कुलगुरू डॉ. गिते हे भारावले. त्यांनी गोदावरी संस्थेच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याचे कौतुक करीत भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमास डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. सी. डी. सारंग, डॉ. धनंजय बोरोले, डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. शिरसाठ, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ होमिओपॅथीचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय तथा संशोधन केंद्राचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

डॉ. विद्यानंद आठवले यांनी प्रास्ताविकातून गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या शैक्षणिक व आरोग्यविषयक कार्याचा तसेच विविध अभ्यासक्रमांच्या विस्ताराचा आढावा मांडला. संभाजी नाट्यगृह परिसरात गोदावरी फाऊंडेशनच्या स्वागत फलकांनी लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमामुळे गोदावरी फाऊंडेशनच्या विविध आरोग्य शिक्षण संस्थांमधील समन्वय आणि विद्यापीठाशी असलेले शैक्षणिक संबंध अधिक दृढ होण्यास चालना मिळाली.

Next Post
गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली; गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली; गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

ताज्या बातम्या

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली; गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम
जळगाव जिल्हा

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली; गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

October 1, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या भव्य सत्काराने कुलगुरू डॉ. गिते भारावले
जळगाव जिल्हा

गोदावरी फाउंडेशनच्या भव्य सत्काराने कुलगुरू डॉ. गिते भारावले

October 1, 2026
जैन हिल्सवर ‘Sunrise & Surrender’ उपक्रम उत्साहात
क्रिडा

जैन हिल्सवर ‘Sunrise & Surrender’ उपक्रम उत्साहात

September 30, 2026
रायफल शूटिंग स्पर्धेत आदित्य सोनवणेचे सुवर्ण; यश विभागीय स्पर्धेसाठी नाशिक येथे निवड
क्रिडा

रायफल शूटिंग स्पर्धेत आदित्य सोनवणेचे सुवर्ण; यश विभागीय स्पर्धेसाठी नाशिक येथे निवड

September 29, 2026
जामनेर येथे तेली समाज पंच मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
शैक्षणिक

जामनेर येथे तेली समाज पंच मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

September 29, 2026
सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: १६ संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला
जळगाव जिल्हा

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: १६ संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

September 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add