• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन हिल्सवर ‘Sunrise & Surrender’ उपक्रम उत्साहात

ध्यान, संगीत आणि फ्री-फ्लो डान्सने जळगावकरांना लाभले नवचैतन्य

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 30, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जैन हिल्सवर ‘Sunrise & Surrender’ उपक्रम उत्साहात

​जळगाव, प्रतिनिधी : जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसरात उगवत्या सूर्याच्या साक्षीने जळगावकरांनी धावपळीच्या जीवनशैलीतून काही क्षण स्वतःसाठी काढत शरीर आणि मनाला नवचैतन्य देणारा ‘Sunrise & Surrender – The Morning Journey’ हा अनोखा उपक्रम अनुभवला. ‘The Unplug Project’ च्या माध्यमातून आयोजित ही खास सकाळची जर्नी केवळ निसर्गभ्रमंतीपुरती मर्यादित न राहता ध्यान, लाइव्ह म्युझिक, फ्री-फ्लो डान्स आणि उत्तम खाद्यसंस्कृतीचा संगम घडवून आणणारी ठरली.

‘Not just a run. Not just a party’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचा मुख्य उद्देश ‘Move, Breathe, Dance, Belong’ या भावनेतून जळगावकरांना एकत्र आणून शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करणे हा होता.
​या मॉर्निग जर्नीची सुरुवात श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या ‘श्रद्धाज्योत’ या श्रद्धास्थळापासून झाली. तेथून श्रद्धाधाम परिसरात बोटींमध्ये तबला वादन, क्लासिकल पियानो वादन आणि मंगोलियन साऊंडच्या माध्यमातून उपस्थितांनी निसर्गाशी संवाद साधला.

अहमदाबाद येथील नामवंत आर्टिस्ट पारस दलाल यांच्या विशेष सादरीकरणामुळे सकाळच्या या अनुभवाला संगीत व मनोरंजनाची वेगळी रंगत मिळाली, तर ध्यान-योगाच्या माध्यमातून सहभागींनी मनःशांतीचा अनुभव घेतला. ‘Run पासून Relaxation पर्यंत’ आणि ‘Music पासून Meditation पर्यंत’ असा हा संपूर्ण प्रवास जळगावकरांसाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला.

​या आगळ्यावेगळ्या उपक्रमात कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जिवने, जिल्हा परिषदेच्या सीईओ करिश्मा नायर, उपवनसंरक्षक सौरेश सहाय, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, निशा जैन, शोभना अजित जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. भावना जैन, क्रेडाईचे राज्यउपाध्यक्ष अनिश शहा, यामिनी शहा, डॉ. जयवंत नागूलकर, डॉ. कल्याणी नागूलकर, प्रेम कोगटा, अथांग जैन, अंबिका जैन, अभेद्य जैन, आणि आंचल जैन यांच्यासह अनेक मान्यवरांनी उत्साहाने सहभाग घेतला.

​अंबिका जैन, जयंतिका आणि सनम यांच्या पुढाकारातून जळगाव शहरात पहिल्यांदाच असा उपक्रम साकारण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी अंबिका जैन यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले, तर डॉ. अश्विन झाला यांनी जैन हिल्स परिसराची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबिका जैन, जयंतिका, सनम आणि जगदीश चावला यांनी विशेष परिश्रम घेतले.


 

Next Post
गोदावरी फाउंडेशनच्या भव्य सत्काराने कुलगुरू डॉ. गिते भारावले

गोदावरी फाउंडेशनच्या भव्य सत्काराने कुलगुरू डॉ. गिते भारावले

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास
गुन्हे

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास

November 25, 2026
कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!
जळगाव जिल्हा

कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

November 25, 2026
ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई
क्रिडा

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

November 25, 2026
शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला
Uncategorized

शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला

November 25, 2026
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी
जळगाव जिल्हा

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी

November 25, 2026
होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन

November 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add