• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

सेवा संकल्प अभियाना’च्या पूर्वतयारीचा जिल्हास्तरीय आढावा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 17, 2026
in जळगाव जिल्हा
0
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

जळगाव, प्रतिनिधी : सेवा संकल्प अभियानात लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्यान पर्यंत पोहचविण्यासोबतच महत्वाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या. जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’च्या पूर्वतयारी संदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, उपविभागीय अधिकारी योगेश कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, विविध विभागांचे विभाग प्रमुख प्रत्यक्ष तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. घुगे पुढे म्हणाले, या अभियानाची जिल्ह्यात प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने आवश्यक नियोजन करावे आणि विशेष नाविन्यपूर्ण उपक्रम तालुका स्तरावर व शहरात प्रभावीपणे राबवावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच त्यांच्या कार्यकाळातील ‘सेवा परमोधर्म’ या भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा, योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

अभियानांतर्गत ‘सेवा सेतू’ उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे / जिवंत सातबारा मोहीम, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतंर्गत सिंचन विहिरी करिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप करणे, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते उपलब्ध करणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आवश्यक नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी घुगे यांनी यावेळी दिल्या.

‘इनोव्हेशन चॅलेंज’ अंतर्गत जिल्ह्यातील युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यावसायिक, कॉर्पोरेटर्स व ग्रामीण भागातील नवीन सोल्युशन्स विकसित करणाऱ्यांना जोडण्यात येणार आहे. ‘सेवा माझे योगदान’ अंतर्गत स्थानिक गरजेनुसार रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, महिलांचे आरोग्य व स्वच्छता, पोषण आणि ॲनिमियाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करावे. शासकीय व खाजगी शाळांमध्ये ‘विकसित भारत’ संकल्पनेवर चित्रकला तसेच ‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ व ‘विकसित भारत-२०४७’ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अंतर्गत ‘विकसित भारत-२०४७’ची सेवा ज्योत यात्रा बाईक रॅली काढून माहिती देण्यात यावी. सर्व अंगणवाडी केंद्रांवर मुलांसोबत मातांना आमंत्रित करून महिलांना आरोग्य व पोषण संदर्भातील योजनांची माहिती संबधित विभागामार्फत देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी या अभियानासंदर्भात जिल्हा परिषदेमार्फत तालूका व ग्राम पंचायत स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती दिली.


 

Next Post
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

ताज्या बातम्या

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप
जळगाव जिल्हा

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप

November 7, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
आरोग्य

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड
जळगाव जिल्हा

शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड

November 6, 2026
जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव जिल्हा

जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

November 6, 2026
जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
खान्देश

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add