जामनेर, प्रतिनिधी : शहरातील शास्त्रीनगर भागात श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या चौथ्या वर्षात तब्बल १०९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. याच सामाजिक भावनेतून यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रेडप्लस ब्लड सेंटर फाउंडेशन यांच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले.

रक्तदान शिबिरासाठी गजानन महाराज भक्त परिवारातील कार्यकर्ते, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. रक्तदान हे जीवनदान असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी ह.भ.प. एकनाथ महाराज चवरे, एकनाथ मिस्तरी, संजय महाजन, राहुल भाऊ चव्हाण, विकास पाटील, ईश्वर प्रल्हाद चवरे,शंकर सातवे, भैय्या परिट, माधव चव्हाण, कैलास पालवे, नाना सातवे, महेंद्र बाविस्कर, दिलीप खोडपे, बाबुराव हिवराळे, चंद्रकांत शिंदे, पप्पू पाटील, सचिन बोरसे, प्रदीप गायके, रविंद्र बंडे, नामदेव पालवे, डॉ. विनोद भोई, जगदीश बैरागी, संतोष सोनवणे, संजय पालवे, गोकुळ साळुंके, युवराज माळी, जयवंत पर्वते, विकास माळी, आकाश साळुंखे यांच्यासह गजानन महाराज भक्त परिवारातील मोठ्या संख्येने नागरिक व भक्त उपस्थित होते.
गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. भक्तीबरोबरच समाजसेवेची परंपरा पुढे नेण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.









