• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 4, 2026
in Uncategorized, जळगाव जिल्हा
0
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

जळगाव, प्रतिनिधी : राज्य शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) १० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, जळगावच्या प्रांताधिकारीपदी आयएएस अधिकारी योगेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या जागी मीना यांची नियुक्ती झाली असून, ते येत्या सोमवारी जळगाव येथे येऊन आपल्या नव्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारण्याची दाट शक्यता आहे. या प्रशासकीय फेरबदलामुळे जळगावच्या महसूल वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

​बी.टेक.चे शिक्षण पूर्ण केलेले योगेशकुमार मीना हे २०२४ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असून, ते सध्या हिंगोली येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेचा अनुभव घेत आहेत. हिंगोलीतील त्यांच्या कार्यकाळानंतर आता राज्य शासनाने त्यांच्यावर जळगाव प्रांताधिकारी पदाची अत्यंत महत्त्वाची व जबाबदारीची धुरा सोपवली आहे. जळगाव प्रांताधिकारी कार्यालयांतर्गत महसूल प्रशासन, आगामी निवडणूक प्रक्रिया, आपत्ती व्यवस्थापन, जमीन महसूल आणि सामान्य नागरिकांचे प्रशासकीय प्रश्न मार्गी लावणे अशा अनेक आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

दरम्यान, तत्कालीन प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या पुढील नवीन नियुक्तीबाबत शासनाच्या आदेशात स्पष्ट उल्लेख नसल्याने त्यांच्या पुढील पदाबाबत प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

योगेशकुमार मीना यांच्या नियुक्तीमुळे जळगावच्या महसूल प्रशासनाला नवा गतीमान चेहरा मिळणार असून, नागरिकांच्या समस्या तत्परतेने सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 

Next Post
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न
जळगाव जिल्हा

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न

October 20, 2026
पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

October 19, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
आरोग्य

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा
खान्देश

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

October 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add