• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 3, 2026
in Uncategorized, आरोग्य, जळगाव जिल्हा
0
गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

जळगाव, प्रतिनिधी : गणेश चतुर्थी, दसरा व दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालयाच्या वतीने ‘भव्य आरोग्य संपदा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्मान कार्ड, नसल्यास ओरिजिनल रेशन कार्ड तसेच आधार कार्ड घेऊन नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे शासकीय योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या विविध आजारांवर सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिरात हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, फुफ्फुसांचे आजार, किडनी विकार, ताप, सर्दी, खोकला, पोटाचे विकार, अ‍ॅसिडिटी, अपचन, रक्तक्षय, सांधेदुखी, कावीळ आदी आजारांसाठी बाह्यरुग्ण विभागाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच डायलिसिस, ब्रॉन्कोस्कोपी, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी आणि २ इको कार्डिओग्राफी यांसारख्या आधुनिक वैद्यकीय तपासणी व उपचार सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अंतर्गत रुग्ण विभागात दमा, न्यूमोनिया, क्षयरोग, फुफ्फुसांचे आजार, हृदयविकाराचा झटका, छातीत दुखणे, श्वसनविकार, अपघात व दुखापती, स्ट्रोक, विषबाधा, साप-विंचू दंश, बेशुद्धावस्था, फिट्स, कोमा तसेच ताप, संसर्ग व सेप्सिस यांसारख्या आपत्कालीन स्थितींवर उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.

शिबिरादरम्यान रुग्णांना आवश्यक तपासण्या व औषधोपचारांमध्ये विशेष सवलत देण्यात येणार असून, रुग्णवाहिका समन्वय सेवा, व्हेंटिलेटर, क्रिटिकल केअर आणि अत्याधुनिक आयसीयू सुविधाही उपलब्ध आहेत. रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवश्यक रक्ताची तयारी मोफत करून दिली जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. शिबिरात डॉ. युवराज बढे व डॉ. रोशन राजपूत यांच्यासह विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे. नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोदावरी फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर
Uncategorized

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 3, 2026
कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add