• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 27, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई

जळगाव, प्रतिनिधी : जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या पथकाने जिल्ह्यातील काही तालुक्यांतून विनापरवाना उत्पादित सौंदर्यप्रसाधनांची विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे अमळनेर व जळगाव शहरात धडक कारवाई केली. जिल्ह्याचे सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र.भा. अस्वार व त्यांच्या पथकाने यांनी ही कारवाई केली.

प्राप्त माहितीनुसार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी अमळनेर येथील प्रियदर्शनी रजाळे यांच्या रवींद्रनगर, अमळनेर येथील ठिकाणी तसेच २४ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव शहरातील राशी तळरेजा यांच्या महाबळ परिसरातील ठिकाणी पंचासमक्ष तपासणी व चौकशी करण्यात आली. दोन्ही विक्रेत्यांकडून अनुक्रमे रुपये ७२ हजार ३९२ आणि ३३ हजार ९३३ रुपये किमतीच्या सौंदर्यप्रसाधनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यावेळी विविध प्रकारचे लेबल व बिना लेबलचे क्रीम, पावडर, जेल फॉर्ममधील उत्पादने तसेच प्रिंटेड लेबल्स, रिकाम्या बरण्या, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आदी उत्पादनाकरिता लागणारे साहित्य कोणत्याही प्रकारचा वैध उत्पादन परवाना नसताना बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याचे आढळून आले.

तसेच लेबलवर सौंदर्य प्रसाधनांची (Cosmetics) साठवणूक करून त्यांची गुणवत्ता तपासणी न करता विक्री केली जात असल्याचेही निदर्शनास आले.

जप्त केलेल्या मालामध्ये विविध क्रीम, पावडर स्वरूपातील अनेक सौंदर्यप्रसाधने, पॅकिंग मटेरियल आदींचा समावेश आहे. त्यापैकी काही सौंदर्यप्रसाधनांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

ही कारवाई डॉ.अस्वार यांच्यासह अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील श्रीमती क. र. पाटील आणि त्यांच्या पथकाने नाशिक विभागाचे सह-आयुक्त (औषधे) अशोक बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली.

नागरिकांनी सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना त्यांच्या लेबलवर उत्पादन परवाना क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, समूह क्रमांक, उत्पादनाची तारीख, मुदत बाह्यता तारीख आदी माहिती नमूद असल्याची खात्री व पडताळणी करूनच सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्याचे आवाहन डॉ.अस्वार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


 

Next Post
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add