• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

गांधी रिसर्च फाउंडेशन व वन विभाग यांच्या संयुक्त उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 12, 2026
in जळगाव जिल्हा
0
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

जळगाव, (प्रतिनिधी) : हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गांधी रिसर्च फाउंडेशन, आणि जळगाव वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अनुभूती निवासी स्कुलच्या पाठीमागील राखीव वनातील कक्ष क्रमांक ४०७ येथे वृक्षारोपण व सीड्स बॉल लागवड कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमात विविध प्रजातींच्या ५०० रोपांची लागवड करण्यात आली. तसेच करंज, कांचन आदी वृक्षप्रजातींच्या ३ हजार सीड्स बॉलची पेरणी करण्यात आली. वनक्षेत्रातील जैवविविधता वाढविणे, स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

कार्यक्रमास जैन इरिगेशन च्या गार्डन व कृषी विभागाचे प्रमुख अजय काळे, संजय सोनजे, पर्सोनल विभागाचे राजेश आगीवाल, जैन इरिगेशनच्या वन व पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, सहाय्यक वनसंरक्षक अमोल चव्हाण व अमोल पंडित, वनपरिक्षेत्र अधिकारी रामकृष्ण लामगे, क्षेत्रीय अधिकारी उमाकांत कोळी, हरिष थोरात, स्वप्निल गोसावी व संभाजी पाटील उपस्थित होते. गांधी रिसर्च फाउंडेशनचे फिल्ड ऑफिसर विक्रम अस्वार, डिव्हाईन गार्डन विभागाचे मयूर देशमुख, शुभम काळे, गोकुळ सपकाळे यांच्यासह चार स्थानिक महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

मान्यवर, महिला बचत गटांच्या सदस्या व ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून वृक्षारोपण आणि सीड्स बॉल लागवडीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या उपक्रमामुळे राखीव वनक्षेत्रातील जैवविविधता संवर्धनास हातभार लागणार असून, स्थानिक पातळीवर हरित महाराष्ट्र अभियानाला अधिक बळ मिळणार आहे.


 

Next Post
बोगस पत्रकारांवर तात्काळ कारवाई करा; गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

बोगस पत्रकारांवर तात्काळ कारवाई करा; गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add