• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

संस्थापक दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे होणार लोकार्पण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 12, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव तर्फे गुरुवारी, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दूध संघाच्या प्रांगणात विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण व उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून दूध संघाचे संस्थापक चेअरमन व माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण लोकार्पण करण्यात येणार आहे.

याचबरोबर शेतकरी प्रशिक्षण केंद्राची नूतनीकरण झालेली इमारत तसेच मुख्य दुग्धशाळेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण आणि वाढीव क्षमता प्रकल्पाचे उद्घाटनही याप्रसंगी पार पडणार आहे.

राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे उद्घाटन करणार आहेत तर प्रमुख पाहुणे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आहेत. अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे आहेत.

या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्यसभा खा. ॲड. उज्ज्वल निकम, खा. स्मिता वाघ तसेच विधान परिषदेचे आ. नंदकिशोर महाजन, आ. राजूमामा भोळे, आ. अनिल पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, आ.अमोल जावळे, आ. चंद्रकांत पाटील आणि आ. अमोल पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सर्व महत्त्वपूर्ण विकासकामांच्या लोकार्पण व उद्घाटन प्रसंगी दूध संघाच्या सर्व सभासदांनी व सदस्यांनी गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता संघाच्या प्रांगणात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण आणि कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी केले आहे.


 

Next Post
अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीर; प्रा. डॉ. अमरदीप पाटील अध्यक्ष तर आर्यन भालशंकर मंत्री

अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीर; प्रा. डॉ. अमरदीप पाटील अध्यक्ष तर आर्यन भालशंकर मंत्री

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add