• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश निश्चित; यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 9, 2026
in शैक्षणिक
0
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी ओम मनोजकुमार पाटील याने देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या जेईई अ‍ॅडव्हॉन्स २०२६ परीक्षेत ऑल इंडिया रँक ६४० मिळवत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या उत्कृष्ट यशाच्या बळावर त्याने देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी कानपूर येथे प्रवेश निश्चित केला आहे.

ओम हा आयटी अभियंता मनोज अरुण पाटील यांचा मुलगा तर निवृत्त केंद्रप्रमुख अरुण रघुनाथ पाटील यांचा नातू तसेच डॉ. प्रशांत अरुण पाटील यांचा पुतण्या आहे. कुटुंबातील शैक्षणिक व संस्कारमूल्यांचा वारसा जपत ओमने कठोर परिश्रम, चिकाटी आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

जेईई अ‍ॅडव्हॉन्स ही परीक्षा देशातील सर्वाधिक कठीण आणि स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक मानली जाते. लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात; मात्र मोजक्याच विद्यार्थ्यांना आयआयटी सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. अशा परिस्थितीत ऑल इंडिया रँक ६४० हा क्रमांक मिळवणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात आहे.ओमच्या या यशामुळे त्याचे कुटुंब, शिक्षक, मित्रपरिवार तसेच यावल तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यशाबद्दल बोलताना ओमने आपल्या पालकांचे, आजोबा-आजींचे, शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे विशेष आभार मानले. सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यामुळे हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावरील यश संपादन करून ओमने अनेक विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या या यशामुळे यावल तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक आणखी उंचावला असून भविष्यात तो अभियांत्रिकी व संशोधन क्षेत्रात मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Next Post
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add