• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

महापौर दीपमाला काळे यांचे नागरिकांना आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 7, 2026
in जळगाव जिल्हा
0
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका, नाशिक येथील ‘हिरवांकुर संस्था’ आणि जळगावच्या ‘ग्रीन सिटी फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात येत्या १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान विविध पर्यावरणपूरक उपक्रम व प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची सविस्तर माहिती देण्यासाठी आज, गुरुवारी महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, “हा महोत्सव केवळ एक प्रदर्शन नसून ही पर्यावरण संवर्धनाची एक मोठी चळवळ आहे. जळगाव शहर स्वच्छ आणि हरित राहावे यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेत सर्व जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा.”

या पाच दिवसीय महोत्सवाच्या रूपरेषेबद्दल माहिती देताना महापौरांनी  प्रमुख बाबी मांडल्या. उद्घाटन बुधवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नूतन मराठा महाविद्यालय येथे या महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन होईल. उद्घाटनापूर्वी शहरातून जनजागृतीसाठी भव्य सायकल रॅली आणि वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. १२ ते १६ ऑगस्टदरम्यान हे पर्यावरण प्रदर्शन सर्व नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

▪️”इंदूर शहराची ओळख जशी देशातील ‘सर्वात स्वच्छ शहर’ म्हणून आहे, त्याच धर्तीवर आपल्या जळगाव शहरालाही स्वच्छ आणि सुंदर बनवायचे असेल, तर प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांनी आपले घर आणि परिसर स्वच्छ राहील यासाठी पुढाकार घ्यावा.”
– दीपमाला काळे, महापौर, जळगाव महापालिका

या पत्रकार परिषदेला नाशिक येथील हिरवांकुर फाउंडेशनचे प्रमुख निलयबाबू जैन शाह, जळगाव ग्रीन सिटीचे संचालक विजयकुमार वाणी, नलिनी शाह आणि कांचन वाणी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या अनोख्या पर्यावरण महोत्सवात शाळा-कॉलेजचे विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Next Post
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add