• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : भारत सरकार आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तर्फे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ या जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना नशा करणार नाही करू देणार नाही ही शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश चंद्रसेन तयाडे हे होते. यावेळी उपप्राचार्य मोहन देविदास सूर्यवंशी, डॉ अशोक चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. नोंगमैथेम ज्ञानेश्वर सिंह व रमाकांत देविदास चौधरी यांनी कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय केले.

युवकांमध्ये अमली पदार्थ आणि विविध व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना निरोगी, सकारात्मक आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी उपस्थित सर्वांनी अमली पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ व इतर व्यसनांपासून दूर राहण्याची तसेच समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याची सामूहिक शपथ घेतली.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांनी युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, कौशल्यविकास आणि सामाजिक बांधिलकी यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. उपप्राचार्य मोहन सूर्यवंशी यांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी निरोगी, सजग आणि जबाबदार युवकांची आवश्यकता अधोरेखित केली. विद्यार्थ्यांनीही विविध जनजागृती उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत ‘नशा मुक्त भारत’ अभियानाला बळकटी देण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच समाजामध्ये सकारात्मक संदेश पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.महाविद्यालय प्रशासन, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. व्यसनमुक्त युवक हेच विकसित भारताचे खरे आधारस्तंभ आहेत, असा संदेश यावेळी देण्यात आला.

ताज्या बातम्या

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 
क्रिडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 5, 2026
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

August 5, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप
आरोग्य

गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप

August 5, 2026
मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद
Uncategorized

मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद

August 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add