• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 5, 2026
in क्रिडा
0
जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत आणि जैन स्पोर्ट्स अकादमी आयोजित जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक ३१ जुलै ते ०२ ऑगस्ट २०२६ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ०९, ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १३, १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता.

या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १३३ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे अध्यक्ष रजनीकांत कोठारी, आर्य मल्टीपर्पज फौंडेशनचे अध्यक्ष मनोज अडवाणी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सहसचिव तनुज शर्मा, सदस्य चंद्रशेखर जाखेटे, जैन स्पोर्ट्स अकॅडेमी चे क्रीडा समन्वयक रविंद्र धर्माधिकारी, आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती वृषाली पाटील, व मुख्य पंच श्रीमती दीपिका ठाकुर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत जैन स्पोर्ट्स अकॅडेमी चे प्रशिक्षक किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी खेळाडूंना सुवर्ण व रजत पदक, क्रीडा साहित्य व प्रमाणपत्र देण्यात आले.

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे.

०९ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – यज्ञा नानकर
उपविजयी – अनन्या माहेश्वरी

११ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – अनय हेमंत पाटील
उपविजयी – ऋत्विक प्रवीण खैरे

११ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – यज्ञा नानकर
उपविजयी – सुमिती ठाकुर

१३ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – मौर्याराज निकुंभ
उपविजयी – दर्शिल राजकुमार मुनोत

१३ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – आरोही धीरज माहेश्वरी
उपविजयी – सर्वेशा संदीप जोशी

१३ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – दर्शील राजकुमार मनोज आणि नमित मगर
उपविजयी – मितांश गुप्ता आणि युवराज सुराणा

१३ वर्षा आतील मुली दुहेरी
विजयी – सर्वेशा संदीप जोशी आणि आरोही धीरज माहेश्वरी
उपविजयी – शर्वरी फालक आणि सिद्धी सोनी

१५ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – अनामय अमोल जोशी
उपविजयी – भावेश सुनील पाटील

१५ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – सिया भोसले
उपविजयी – स्निग्धा संजय पाटील

१५ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – अद्वय जोशी आणि अनामय अमोल जोशी
उपविजयी – भावेश पाटील आणि विहान बागड

१५ वर्षा आतील मुली दुहेरी
विजयी – मिहिका राजपूत आणि सायुरी राजपूत
उपविजयी – सर्वेशा संदीप जोशी आणि आरोही धीरज माहेश्वरी

१७ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – नैतिक राजेश शिंदे
उपविजयी – श्लोक जगताप

१७ वर्षा आतील मुली एकेरी
विजयी – ओवी अमोल पाटील
उपविजयी – पुनम ठाकूर

१७ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – नैतिक शिंदे आणि स्वामी पाटील
उपविजयी – रजत प्रेमल पटेल आणि शंतनु शैलेश फालक

१७ वर्षा आतील मुली दुहेरी
विजयी – ओवी पाटील आणि तनिषा साळुंखे
उपविजयी – तवास्मी वरून मोहता आणि पूनम ठाकुर

१९ वर्षा आतील मुले एकेरी
विजयी – वैभव विलास परदेशी
उपविजयी – फाल्गुन पाटील

१९ वर्षा आतील मुले दुहेरी
विजयी – रजत प्रेमल पटेल आणि फाल्गुन राजेश पाटील
उपविजयी – वैभव विलास परदेशी आणि हिमेश पाटील

१९ वर्षा आतील मिश्र दुहेरी
विजयी – फाल्गुन राजेश पाटील आणि तवास्मी वरून मोहता
उपविजयी – जयेश पवार आणि ओवी पाटील

पुरुष एकेरी
विजयी – तेजम केशव
उपविजयी – घनश्याम पाटील

महिला एकेरी
विजयी – राजश्री पाटील
उपविजयी – वृषाली धांडे

पुरुष दुहेरी
विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर आणि वैभव परदेशी
उपविजयी – घनश्याम पाटील आणि सुफयान शेख
मिश्र दुहेरी
विजयी – देव वेद आणि वृषाली धांडे
उपविजयी – अंकित कोली आणि राजश्री पाटील

३५ वर्षावरील पुरुष एकेरी
विजयी – विनायक बालदी
उपविजयी – अतुल ठाकुर

३५ वर्षावरील पुरुष दुहेरी
विजयी – तनुज शर्मा आणि तुषार उपाध्ये
उपविजयी – विनायक बालदी आणि कीर्ती मनोज

३५ वर्षावरील मिश्र दुहेरी
विजयी – विनायक बालदी आणि वृषाली पाटील
उपविजयी – किर्ती मुनोत आणि वृषाली धांडे

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती दीपिका ठाकुर व पंच म्हणून पूनम ठाकूर, शुभम जितेंद्र चांदसरकर, अर्श शेख, लोकेश देशमुख, तेजम केशव, फाल्गुन पाटील, रजत पटेल, उदित मुंदडा, शंतनु फालक यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत करण पाटील, देव वेद, श्लोक जगताप, जाजीब शेख, सुफ्यान शेख, नमन जैन , स्निग्धा पाटील, अंबिका साबळे, मिहिका राजपूत, सायुरी राजपूत, सुमिती ठाकुर, राखी ठाकुर यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जैन स्पोर्टस अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांनी केले.

या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन यांनी केले व विजेता खेळाडूंना पुढच्या होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा चषक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 

Next Post
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास
गुन्हे

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास

November 25, 2026
कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!
जळगाव जिल्हा

कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

November 25, 2026
ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई
क्रिडा

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

November 25, 2026
शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला
Uncategorized

शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला

November 25, 2026
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी
जळगाव जिल्हा

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी

November 25, 2026
होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा; नर्सिंग विद्यार्थ्यांना आवाहन

November 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add