• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 1, 2026
in शैक्षणिक
0
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

जळगाव, (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथील जैवरसायनशास्त्र विभागाच्या वतीने प्रथम एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी ‘बायोक्वेस्ट २०२६’ या बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके यांच्यासोबत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील जैवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश जांभुळकर, बायोकेमस्ट्री विभागाच्या प्रमुख डॉ. निलीमा पाटील, डॉ. रणधीर कुमार पांडे, डॉ. दिप्ती कात्रे, डॉ. योगेश तायडे, डॉ. प्रकाश तिरुवा, डॉ. सुनील तेटांबे, डॉ. राशिका सक्सेना आणि डॉ. आयुष महाजन तसेच डॉ. बापूराव बीटे, डॉ. पल्लवी बढे आणि डॉ.युवराज बढे, डॉ. ऋतुजा एस. बिर्हाडे आदी मान्यवर उपस्थीत होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. प्रशांत सोळंके यांनी ‘बायोक्वेस्ट २०२६’ या स्पर्धेतील मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक संघामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय या दोन्ही संस्थांमधील प्रत्येकी एक विद्यार्थी सहभागी होता. समुदाय वैद्यकशास्त्राच्या भाषेत सांगायचे झाल्यास, ही संकल्पना ‘डबल ब्लाइंडिंग’सारखी होती, ज्यामुळे पूर्वग्रह दूर होऊन स्पर्धेची पारदर्शकता आणि निष्पक्षता अधिक बळकट झाली. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ विषयज्ञानच नव्हे तर टीमवर्क, संवादकौशल्य आणि व्यावसायिक सहकार्याचेही महत्त्व समजते. ‘बायोक्वेस्ट २०२६’चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जैवरसायनशास्त्र विभागाचे त्यांनी अभिनंदन केले. भविष्यातही अशा आंतरमहाविद्यालयीन शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन व्हावे, ही अपेक्षा आहे असे सांगितले.

स्पर्धेत एकूण चार संघांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक संघात दोन विद्यार्थी सहभागी असल्याने एकूण आठ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत आपले ज्ञान व कौशल्य सादर केले. प्रश्नोत्तरांच्या विविध फेर्यांमधून विद्यार्थ्यांनी बायोकेमिस्ट्री विषयावरील सखोल ज्ञानाचे प्रदर्शन केले प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील जैवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश जांभुळकर उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैद्यकीय शिक्षणामध्ये बायोकेमिस्ट्री विषयाचे महत्त्व अधोरेखित केले तसेच अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असल्याचे सांगितले.

स्पर्धेचे आयोजन जैवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख व प्राध्यापक डॉ. निलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आयोजन समितीत डॉ. रणधीर कुमार पांडे, डॉ. दिप्ती कात्रे, डॉ. योगेश तायडे, डॉ. प्रकाश तिरुवा, डॉ. सुनील तेटांबे, डॉ. राशिका सक्सेना आणि डॉ. आयुष महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी डॉ. बापूराव बीटे, डॉ. पल्लवी बढे आणि डॉ.युवराज बढे, डॉ. ऋतुजा एस. बिर्हाडे यांचीही उपस्थिती लाभली. बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धेचा निकाल प्रथम क्रमांक – टीम बी आरुष गुप्ता, मधुरा युवराज बढे, द्वितीय क्रमांक – टीम सी अर्जुन रमेश मांडवे, लक्ष्मी सुषमा देशमुख, तृतीय क्रमांक – टीम डी आद्या आहुजा, शैलेश माणिक फेगडे, चतुर्थ क्रमांक – टीम ए लक्षिता संजय जवांजळ तनमय भैरवनाथ देशमुख


 

ताज्या बातम्या

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
शैक्षणिक

डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

August 1, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 1, 2026
भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर
आरोग्य

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून महिलांसाठी आरोग्य शिबीर

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

July 31, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी

July 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add