• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

प्राचार्यांच्या हस्ते पालखी पूजन; टाळ-मृदुंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात पालखी सोहळा व पारंपरिक रिंगण सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत केली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ, मृदुंग, भगवे पताके, तुळशी वृंदावन तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या आकर्षक वेशभूषेत पंढरपूरच्या वारीचे प्रभावी दर्शन घडविले.कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांची विशेष मने जिंकली.

विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध, भावपूर्ण आणि आकर्षक पद्धतीने रिंगण साकारत प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीचा अनुभव उपस्थितांना दिला. “ज्ञानोबा-तुकाराम” तसेच “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या जयघोषांनी संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांची तसेच भक्ती, समता, सेवा आणि एकात्मतेच्या मूल्यांची प्रेरणा देण्यात आली. भारतीय संस्कृती आणि परंपरांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदरभाव निर्माण करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे, आकर्षक सादरीकरणामुळे आणि पालखी-रिंगण सोहळ्याच्या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत आनंददायी व संस्मरणीय ठरला. उपस्थित पालक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या अभिनयाचे, सांस्कृतिक सादरीकरणाचे आणि वारकरी परंपरेच्या प्रभावी सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.


 

Next Post
आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add