• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 22, 2026
in गुन्हे
0
एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

​भुसावळ, (प्रतिनिधी) : दोन ग्राहकांच्या ऑनलाइन सौर ऊर्जा प्रणालीच्या मंजुरी व रिलीज ऑर्डर देण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे एकूण २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अभिमन्यू पाटील (वय ४९, वर्ग-१) यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (२२ जुलै) रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे सोलर सिस्टीम बसवण्याची एजन्सी आहे. त्याअंतर्गत भुसावळ शहरातील दोन ग्राहकांनी सोलर सिस्टीम खरेदी केली होती. या दोन्ही प्रकरणांची मंजुरी व रिलीज ऑर्डर मिळवण्यासाठी महावितरण भुसावळ शहर १ कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले होते.

​मात्र, काम प्रलंबित ठेवल्याने तक्रारदार यांनी २२ जुलै रोजी पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी दोन्ही प्रकरणांच्या मंजुरीसाठी नितीन पाटील यांनी २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

​प्राप्त तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, नितीन पाटील यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

​ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदिप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील, संगीता पवार आणि बाळू मराठे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर करत आहेत.

Tags: AnticurptionCrimePolice
Next Post
यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला

यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला

ताज्या बातम्या

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add