• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

हातात माती... मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

जळगाव, (प्रतिनिधी) : अनुभूती बालनिकेतन मॉन्टेसरी व अनुभूती विद्या निकेतन येथे दि. १३ ते १८ जुलै दरम्यान “अनुभूती ट्री फेस्टिव्हल” साजरा करण्यात आला. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सीड बॉल (बीजगोळे) तयार करत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला. माती, सेंद्रिय खत आणि स्थानिक वृक्षांच्या बियांचा वापर करून तयार होणारे सीड बॉल विद्यार्थ्यांसाठी केवळ एक उपक्रम नव्हते, तर निसर्गाशी नवे नाते जोडणारा अनुभव ठरला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता, हातात माती आणि मनात हिरवे भविष्य घडविण्याचे स्वप्न दिसत होते.

जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, अनुभूती स्कुलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, अंबिका जैन यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या संकल्पनेला प्राचार्य मनोज परमार यांच्यासह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कृतीची जोड दिल्याने विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम संस्मरणीय ठरला. जैन इरिगेशनचे गार्डन विभागाचे अजय काळे, गिरीष जगताप, पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, मयूर देशमूख तसेच सर्व ताई-दादांनी विद्यार्थ्यांना सीड बॉल तयार करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली.

विद्यार्थ्यांना देशी वृक्षांच्या बिया, माती आणि नैसर्गिक खताचा वापर करून वैज्ञानिक पद्धतीने सीड बॉल तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सीड बॉल तयार केले. हे सीड बॉल पावसाळ्यात विविध ठिकाणी टाकून, त्याद्वारे हरित क्षेत्र वाढविणे, नैसर्गिक वनस्पतींचे पुनरुज्जीवन आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

समारोप कार्यक्रमात संचालिका अंबिका जैन यांनी विद्यार्थ्यांना सीड बॉलचे वितरण केले. यावेळी अंबिका जैन बोलताना म्हणाले की, ‘हॅण्ड, हार्ड आणि हेड याद्वारे निर्माण झालेली सीड बॉल हे निसर्गाशी जुळणारी कृती आहे. कारण त्यांनी स्वत: ते केले आहे. वनसंवर्धन, वन्यजीवांचे संरक्षण आणि निसर्गाप्रती संवेदनशीलतेचा यातून संदेश जातो. विद्यार्थ्यांना ‘ग्रीन अम्बेसेडर’ बनून अधिकाधिक झाडे लावण्याचे, त्यांचे संगोपन करण्याचे आणि पर्यावरण संरक्षणाला आपल्या जीवनाचा भाग बनविले पाहिजे.

खेळता-खेळता मुलांनी बीजसंवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश आत्मसात केला. वर्गखोल्यांबाहेर घडलेला हा उपक्रम मुलांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरला. सीड बॉल पावसाळ्यात डोंगराळ, दुर्गम आणि ओसाड भागात फेकल्यास योग्य वातावरण मिळाल्यावर त्यातून रोपे उगवतात आणि नैसर्गिकरीत्या हरितक्षेत्र वाढण्यास मदत होते. ही संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगण्यात आली. त्यामुळे पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, याची जाणीव लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात रुजल्याचे प्राचार्य मनोज परमार म्हणाले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी हातात सीड बॉल घेत “झाडे लावू, झाडे जगवू आणि पर्यावरण वाचवू” अशी सामूहिक प्रतिज्ञा केली. या निरागस हातांनी तयार केलेले बीजगोळे उद्या हजारो वृक्षांचे रूप धारण करतील, अशी आशा व्यक्त करत ‘अनुभूती ट्री फेस्टिव्हल’ ने पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविला.


 

Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

ताज्या बातम्या

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add